हिवरगाव पावसा येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी

Cityline Media
0
संगमनेर नितीनचंद्र भालेराव कुळवाडी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त तालुक्यातील हिवरगाव पावसा येथे अभिवादन करण्यात आले.
शिवसेना उबाठा व हिवरगाव पावसा ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने शिवजयंती उत्साहात पार पडली.विविध संस्थांचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत  छत्रपती शिवरायांची आरती झाली.जय भवानी !जय शिवाजी! जयघोषाने भारावलेले वातावरण,पोवाड्यां मधून उलगडणारी शिवाजी महाराजांची शौर्यगाथा अन् भगवे ध्वज हातात घेऊन उत्साहात सहभागी झालेले आबालवृद्ध छत्रपती शिवाजी महाराजां बद्दलचा आदर,प्रेम आणि अभिमान व्यक्त करत  शिवप्रेमी नागरिकांनी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी केली.

प्रसंगी शिवसेना तालुका प्रमुख भीमाशंकर पावसे,सरपंच सुभाष गडाख,राजहंस दूध संघाचे संचालक डॉ.प्रमोद पावसे,प्रा.बाबुराव पावसे,वृक्षमित्र गणपत पावसे,
अध्यक्ष खंडोबा देवस्थान ट्रस्ट बाबासाहेब पावसे,उपाध्यक्ष खंडोबा देवस्थान संतोष पावसे,
जेष्ठ संपादक यादवराव पावसे,  भाजपा तालुका सरचिटणीस गणेश दवंगे,सेवा निवृत्त पोलीस निरीक्षक नारायण पावसे,जय मल्हार दूध संस्थेचे चेअरमन डॉ.संदीप पावसे,कला सम्राज्ञी पवळा कला मंचाचे सचिव नितीनचंद्र भालेराव,आप्पासाहेब गडाख,अनिल गडाख यांच्या सह इतर मान्यवर उपस्थित होते.

या प्रसंगी महाराजांनी केलेली स्वराज्य स्थापना ते त्यांची एकूण कार्यपद्धती अशी महाराजांची विविध कौशल्ये मांडली. शिवरायांनी मराठी माणसाचा कणा ताठ करून, त्याला सन्मानाने जगण्याची प्रेरणा दिली. त्यांचा आदर्श प्रत्येक तरुण पिढीने घेतला पाहिजे असे सरपंच सुभाष गडाख यांनी म्हटले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठीशिवसेना तालुकाप्रमुख भीमाशंकर पावसे,प्रा.बाबुराव   गणपत पावसे,विकास पावसे,समाधान भालेराव,अशोक पावसे,अशोक नेहे,संदीप टेमगिरे,सिताराम गडाख गुरुजी,गणेश गडाख,
रामनाथ पावसे,सुभाष पावसे,मच्छिंद्र गडाख, राधाकिसन पावसे,राजू सुखदेव पावसे,सोमनाथ पावसे  महिला वंदना पावसे,रंजना पावसे,कल्पना गुंजाळ,अनिता दिवटे,रेखा पावसे इतर महिला,कार्यकर्ते आणि हिवरगाव पावसा ग्रामस्थ मोठ्या संख्येत उपस्थित होते.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!