नाशिक दिनकर गायकवाड अल्पवयीन मुलीला तिच्या संमतीशिवाय जबरदस्तीने मोटार सायकलीवर बसवून तिचे अपहरण करणान्या युवकाला पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी यांची अल्पवयीन मुलगी अरिंगळे मळा येथील विठ्ठल मंदिराजवळून जात होती. त्यावेळी आरोपी रेहान कय्युम शेख (वय १९, रा. खापरे मळा, ओढा रोड, नाशिकरोड) व त्याचा एक मित्र यांनी मुलगी अल्पवयीन असल्याचा गैरफायदा
घेऊन तिला धमकावून फूस लावून तिला आरोपीशी बोलण्यास भाग पाडले, तसेच तिच्या संमतीशिवाय तिला जबरदस्तीने मोटारसायकलीवर बसवून पंचवटी परिसर व तपोवन येथे घेऊन जात तिचे अपहरण केले. या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत व ॲट्रोसिटी कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात येऊन रेहान शेख व त्याच्या मित्राला अटक करण्यात आली आहे. याबाबतचा पुढील तपास सहाय्यक पोलीस आयुक्त निकम करीत आहेत.
