राहाता तालुक्यातील २८ केंद्रावर मिशन आरंभ सखी परिक्षा केंद्र उपक्रम

Cityline Media
0
जागतिक महिला दिनाचे औचित्य 

लोणी रूपाली भालेराव जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून शिक्षण विभागाने राहाता तालुक्यामध्ये मिशन आरंभ उपक्रम नाविन्यपूर्ण पद्धतीने लोणीत नुकताच राबविला असुन महिला शिक्षिकांनी संचलित केलेल्या 'सखी परीक्षा केंद्र'; शिक्षण विभागाचा अभिनव उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
 महिला सक्षमीकरणाच्या दिशेने एक पाऊल टाकत तालुक्यातील दोन परीक्षा केंद्रांची संपूर्ण जबाबदारी फक्त महिला शिक्षिकांकडे सोपवण्यात आली होती.सखी परीक्षा केंद्र' या नावाने ओळखल्या गेलेल्या या उपक्रमांतर्गत केंद्र संचालकांपासून ते पर्यवेक्षकांपर्यंतची सर्व महत्त्वाची कामे महिलांनी अत्यंत सक्षमपणे आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडून एक नवा आदर्श निर्माण केला आहे.

मानवी इतिहासाच्या विकासामध्ये स्त्री शक्तीचे योगदान अतुलनीय असून, त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि त्यांच्या कर्तृत्वाला व्यासपीठ मिळवून देण्यासाठी हा विशेष उपक्रम राबविण्यात आला.जिल्हा परिषदेमार्फत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ करण्यासाठी 'मिशन आरंभ' हा महत्त्वाकांक्षी उपक्रम सध्या सुरू आहे.

या उपक्रमाचा एक भाग म्हणून जिल्हा परिषद शाळांमधील चौथी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी सराव परीक्षांचे आयोजन करण्यात आले होते.राहाता तालुक्यातील एकूण २८ केंद्रांवर ही परीक्षा पार पडली. या शैक्षणिक वर्षापासून शालेय शिक्षण विभागाने चौथी आणि सातवीची शिष्यवृत्ती परीक्षा पुन्हा त्याच वर्गांची घेण्याचे धोरण स्वीकारले आहे.

या बदललेल्या धोरणानुसार एप्रिल २०२६ मध्ये होणाऱ्या अंतिम परीक्षेसाठी विद्यार्थी पूर्णपणे तयार व्हावेत, हा या सराव परीक्षेचा मुख्य उद्देश होता. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष परीक्षेचा अनुभव मिळावा, त्यांच्या मनातील परीक्षेची भीती दूर व्हावी आणि त्यांनी आत्मविश्वासाने मुख्य परीक्षेला सामोरे जावे, यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी आणि शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रश्नपेढी आणि सराव वर्गांचे नियोजन करण्यात आले.

या उपक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे सखी परीक्षा केंद्रांवर करण्यात आलेली आकर्षक सजावट. महिला दिनाचे औचित्य साधून ही केंद्रे सुशोभित करण्यात आली होती, जिथे सर्व महिला अधिकारी, शिक्षिका आणि विद्यार्थिनींचा यथोचित सत्कार करण्यात आला.

लोणी येथील केंद्र संचालिका चंदा गायकवाड यांनी या उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, महिलांचा सन्मान करणारा हा उपक्रम अत्यंत औचित्यपूर्ण आहे. अशा प्रकारचे उपक्रम नियमितपणे राबवले गेल्यास शैक्षणिक गुणवत्तेसोबतच सामाजिक जाणीव देखील प्रगल्भ होईल आणि महिला सबलीकरणाला खऱ्या अर्थाने मूर्त रूप मिळेल.

सौ.शालिनीताई विखे पाटील यांनी देखील या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले असून, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या उपक्रमास आपल्या शुभेच्छा दिल्या आहेत.'मिशन आरंभ' सारख्या उपक्रमांमुळे केवळ ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता सुधारत नसून, समाजात एक सकारात्मक सामाजिक बांधिलकीची भावना देखील निर्माण होत आहे.

या परीक्षेचे संपूर्ण नियोजन राहाता तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी राजेश पावसे यांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षा समन्वयक पंकज दर्शने, सर्व विस्तार अधिकारी आणि केंद्रप्रमुख यांनी अत्यंत यशस्वीरीत्या पूर्ण केले. समाजाच्या सर्व स्तरातून या उपक्रमाचे स्वागत होत असून, महिलांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या या परीक्षा केंद्रांची विशेष चर्चा परिसरात सुरू
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!