त्र्यंबकेश्वरच्या दापुरे येथे बालविवाह रोखण्यास प्रशासन यशस्वी

Cityline Media
0
नासिक दिनकर गायकवाड त्र्यंबकेश्वर तालुक्यातील मौजे दापुरे येथे गोपनीय पद्धतीने होऊ घातलेला बालविवाह प्रशासन व स्थानिक यत्रणांच्या तत्परतेमुळे रोखण्यात आला असून या कारवाईमुळे बालविवाह प्रतिबंधाबाबत प्रभावी संदेश देण्यात आला आहे.ढापुरे येथे अल्पवयीन मुलीचा विवाह आयोजित करण्यात येत असल्याची माहिती प्रशासनास मिळाल्यानंतर तत्काळ संबंधित यंत्रणा सक्रिय झाली.जिल्हा महिला व बालविकास विभागाचे पथक, घोटी पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी,ग्राम बालसंरक्षण समिती तसेच ग्रामस्तरीय न कर्मचारी यांच्या संयुक्त पथकाने नियोजित विवाह स्थळी भेट दिली.

यावेळी मुलीचे पालक व होणारा वर यांना बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार असलेल्या दंडात्मक तरतुदी,कायदेशीर परिणाम तसेच अल्पवयीन विवाहामुळे होणारे सामाजिक व आरोग्यविषयक दुष्परिणाम याबाबत सविस्तर समुपदेशन करण्यात आले.प्रशासनाने संयमित व समजूतदार पद्धतीने केलेल्या समुपदेशनामुळे संबंधित कुटुंबीयांनी परिस्थितीची गंभीरता ओळखून विवाह सोहळा रद्द करण्यास सहमती दर्शविली.

त्यानुसार विवाहासाठी उभारण्यात आलेला मंडप,डीजे तसेच अन्य तयारी तात्काळ काढून टाकण्यात आली.तसेच विवाहासाठी आलेल्या

क्हाडी मंडळींनाही परत पाठविण्यात आले.या समन्ववपूर्ण कारवाईमुळे बालविवाहला मशस्वीपणे प्रतिबंध करण्यात आला.या कारवाईत ग्रामपंचायत झारखंड बुकचे ग्रामपंचायत अधिकारी तसेच बालविवाह प्रतिबंधक अधिकारी स्वप्निल पाटील यांनी प्रमुख भूमिका बजावली तर माजी सरपंच चंदर लोभी, मा.उपसरपंच सोमनाथ बोराडे, प्रतिष्ठित नागरिक मनोज बोराडे, मुख्य सेविका बेता गडाख तसेच घोटी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शिंदे-पाटील, पोलीस उपनिरीक्षक उदय पाटील आणि बीट हवालदार बाळासाहेब आहेर यांनी सहकार्य केले. त्यांना ग्राम बाल संरक्षण समिती, ग्रामस्तरीय कर्मचारी, अंगणवाडी सेविका तसेष स्थानिक ग्रामस्थांनी मोहिमेत यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. तसेच मुलाच्या गावातील परिस्थिती लक्षात घेऊन समुपदेशनासाठी ग्रामपंचायत अधिकारी शरद आव्हाड यांनीही सहकार्य केले.

या संपूर्ण कारवाई दरम्यान मुलीची ओळख गोपनीय ठेवण्यात आली असून कायद्यानुसार लिचे व तिच्या पालकांचे नाव जाहीर करण्यात आलेले नाही.ही कारवाई जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.वर्षा फडोळ, प्रशासक संदीप खैरनार तसेच गटविकास अधिकारी रविकांत सानप यांचेही मार्गदर्शन लाभले.

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!