दुचाकी घसरल्याने युवकाचा दुर्दैवी मृत्यू

Cityline Media
0
नाशिक दिनकर गायकवाड दुचाकी घसरल्याने गंभीर
जखमी झालेल्या युवकाचा मृत्यू झाल्याची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
घडलेल्या घटनेबाबत पोलीस हवालदार भाऊसाहेब झाडे यांनी फिर्याद दिली आहे.त्यात म्हटले,की सुनील शिवाजी गुजर (वय ३६, रा. सोनेवाडी, ता. निफाड) हा तरुण दि. १३ जानेवारी रोजी सायंकाळच्या सुमारास एमएच १५ केएन ४६९१ या क्रमांकाच्या मोटार सायकलीने जात होता.

सिन्नरकडून नाशिककडे जाणाऱ्या महामार्गावर किरण हॉटेलसमोर गुजर याची मोटारसायकल स्लीप झाल्याने त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती.त्याला उपचारासाठी आडगाव मेडिकल कॉलेज येथे दाखल केले असता उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून,याबाबतचा पुढील तपास पोलीस हवालदार झाडे करीत आहेत.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!