इगतपुरी बोधिवती देहाडे येथील एका तलावात बुडून १६ वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना नुकतीच घडली.
घडलेल्या घटनेबाबत वृत्त असे की शुक्रवार १३ मार्च रोजी येथील सोळा वर्षीय युवक कार्तिक परदेशी मित्रांसोबत फिरायला गेल्यावर त्याला पाण्यात पोहण्याचा मोह आवरता आला नाही.पाण्यात उडी मारल्यावर तलावाच्या खोलीचा अंदाज न आल्याने तो बुडाला त्याचा दोन दिवसापासून शोध सुरु होता.नुकतेच रात्रीच्या सुमारास पाणबुड्यांच्या मदतीने शोध लावण्यात आला.त्याचा बुडून मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.युवकाचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी इगतपुरी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. इगतपुरी पोलीस पुढील तपास करत आहेत.
