पण पावलोपावली का? भिती उभी राहावी,
दोष तिच्या वेषाचा,असा विचार का होई? चूक करणारा मोकळा,हे शोभे का कुठेच नाही,
स्त्री म्हणजे सन्मान,नाही वस्तू बाजारातली,तिच्या "नाही"ला अर्थ आहे, समजून घ्यावं समाजानी
बलात्कार हा गुन्हा घोर, माणुसकीचा अंत
कठोर शिक्षा हवी आता,संपो सहनशीलतेची खंत
घडवूया मुलांचे मन,सन्मानाची शाळा,
आई-बहिणाचा आदर, हा संस्कार झाला पाहिजे मना,
कायदे असेऊ मजबूत,पण विचार सुद्धा बदला
तेव्हाच सुरक्षित होईल स्त्रीच्या प्रत्येक पाऊलखुणेचा तळा.
आज आवाज उठो सारा, अन्यायाला रोखो,
स्त्री सुरक्षित असेल तेव्हाच खरा समाज शोभो
समानतेची पहाट येईल,हा विश्वास धरूया
स्त्री सन्मान,स्त्री सुरक्षा हाच मंत्र जपूया.
कवायत्री कोमल सतिष भोईर भिवंडी, जि.ठाणे
