तपास अधिकाऱ्यांची भूमिका संशयास्पद तक्रारदार सौ.कविता बबन जगताप
संगमनेर,प्रतिनिधी तालुक्यातील चिखली गावच्या शिवारात महार वतन इनाम जमिनीवर कोणत्याही सक्षम अधिकाऱ्याची परवानगी न घेता आर्थिक फायदा करून घेत बेकायदेशीर सिमेंट रस्ता आणि भूमिगत गटाराचे बांधकाम केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.तर पंधरा ते सोळा दिवसांपूर्वी यातील दोन ठेकेदाराविरुद्ध ॲट्रॉसिटी कायदा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून संबंधित तपास अधिकारी पुढील चौकशीस जाणूनबुजून टाळाटाळ करत असल्याचा आरोप तक्रारदार सौ कविता बबन जगताप यांनी केला आहे तसेच ज्या साधनांचा वापर करून हे अनाधिकृत काम करण्यात आले ते साधने सुद्धा पोलिसांनी जप्त करावी अशी मागणी देखील सौ.जगताप यांनी केली आहे.
सिन्नर तालुक्यातील सौ कविता बबन जगताप यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संगमनेर शहर पोलीस ठाण्यात दोन ठेकेदारांविरुद्ध ॲट्रॉसिटीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संगमनेर शहर पोलीस ठाणे येथे नुकताच चिखली तालुका संगमनेर येथील दलित वस्ती सुधार योजनेच्या माध्यमातून सिमेंट काँक्रीट रस्ता व बंदिस्त गटार चे काम मंजूर झालेले होते हे काम ठेकेदार प्रतीक भोकनळ व अरविंद हासे या दोन ठेकेदारांच्या नावे ग्रामपंचायत माध्यमातून टेंडर नोटीस होऊन या कामाबाबत कार्यादेश देण्यात आले होते.
या कामाबाबत शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार करणे अपेक्षित असताना तसेच सदरची कामे मंजूर वस्तीतच व शासनाच्या जागेतच करणे बंधनकारक आहे मात्र असे न करता ठेकेदाराने मंजूर काम हे वस्तीचे तसेच शासनाच्या जागेची कोणत्याही प्रकारची शहानिशा न करता येथील खाजगी मिळकत धारकांच्या महार वतन ६-ब च्या जमिनीत भोगवटदारांची कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता केल्याने या क्षेत्राचे मूळ मालक कविता बबनराव जगताप यांनी संगमनेर शहर पोलीस ठाण्यास नुकतेच प्रत्यक्ष भेट देऊन गुन्हा दाखल करून घेतला आहे.
फिर्यादीच्या आईचा पश्चात चिखली येथील महार वतन जमीन वारसा हक्काने त्यांचा आणि त्यांचा नातेवाईकांचा नावे असून ती त्यांच्या सामायिक ताब्यात आहे दरम्यानच्या काळात चिखली ग्रामपंचायत ने अनुसूचित जाती वस्ती विकास योजना अंतर्गत सन २०२२ -२३ आणि २०२३ २४ या आर्थिक वर्षासाठी रस्ता कॉंग्रेटीकरण व भूमिकेत गटार बांधकामाचा निधी मंजूर करून घेतला होता या कामाचा ठेका चिखली येथील अरविंद सोमनाथ हासे व मंगळापुर येथील प्रतीक भाऊसाहेब या दोन ठेकेदारांना देण्यात आला होता.
नियमानुसार वर्ग दोनच्या जमिनीचा ताबा घेताना किंवा तिचा शेती व्यतिरिक्त वापर करताना जिल्हाधिकाऱ्यांची रीतसर परवानगी घेणे कायदेशीर रित्या अनिवार्य असते मात्र संबंधित ठेकेदारांनी या नियमांचे उल्लंघन करत आणि स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी नियोजित जागी काम न करता फिर्यादीच्या मालकीच्या खाजगी शेत जमिनीत कायमस्वरूपी बांधकाम करून मोठे नुकसान केले.
या अनधिकृत अतिक्रमणाबाबत फिर्यादी सौ.कविता बबनराव जगताप यांनी २८ ऑक्टो ऑक्टोबर २०२५ रोजी पंचायत समिती संगमनेर गट विकास अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती.
प्रशासकीय स्तरावर सातत्याने पत्रव्यवहार करू नये न्याय मिळत नसल्याचे पाहून अखेर पीडितेने पोलिसात धाव घेतली या तक्रारीची गंभीर दखल घेतलीत संगमनेर शहर पोलिसांनी शनिवार दिनांक २८ फेब्रुवारी २०२६ रोजी त्या रात्री आरोपीविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर झिरो ०१७८० / २०२६ नुसार गुन्हा नोंदवला आहे. यामध्ये भारतीय न्याय संहिता २०२३चे कलम३२४(४),३२९(३) आणि अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम (ॲट्रॉसिटी)१९८९चे३(१)(एफ) यांचा समावेश करण्यात आला आहे.
गुन्हा दाखल होऊन दहा ते पंधरा दिवस झालेले असताना देखील तपास अतिशय धिम्या गतीने सुरु आहे.दोन दिवसांपूर्वी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांना समक्ष भेटून तपासी अधिकारी बदलून देण्याची व आरोपींवर अटकेची कारवाई करणे बाबत मागणी केलेली आहे.
या गुन्ह्यात दोन ग्रामसेवक,पंचायत समिती संगमनेरचे विस्तार अधिकारी, शाखा अभियंता जि.प.सार्वजनिक बांधकाम विभाग शाखा अभियंता पाणीपुरवठा आणि ग्रामपंचायतच्या सरपंच सदस्यांना देखील याप्रकरणी आरोपी करण्याची मागणी तक्रारदार सौ.कविता बबन जगताप यांनी केली आहे.
उपविभागीय पोलिस अधिकारी कुणाल सोनवणे यांच्याशी याबाबत दुरध्वनीवरुन विचारले असता ते म्हणाले की आता आरोपींना नोटीस बजावण्यात आली असून लवकरच दोषारोप पत्र दाखल करण्यात येईल.
