मैत्रीचा अत्युच्चबिंदू

Cityline Media
0
मैत्री म्हणजे काय असते?
शब्दांऐवडी मोठी संकल्पना असते,
मैत्री म्हणजे श्रावणातल्या
येणाऱ्या पाऊसधारा |
मैत्री म्हणजे अथांग सागराच्या
येणाऱ्या उंच लाटा |
मैत्री म्हणजे नात्यातल्या
दृढ विश्वासाची सावली असते |
मैत्री म्हणजे येणाऱ्या
अडचणींना सामोरे जाण्याची
वाट असते |
मैत्रीत असतो वेगळाच थाट,
मैत्रीत असतो तो
शोभणारा रुबाब |
मैत्री निझर पाण्यासारखी
शुद्ध असावी,
मैत्री उंच दिसणाऱ्या
आकाशाएवढी स्वच्छंदी असावी |
मित्राची साथ ही
खळखळून हसवणारी,
मैत्रीची साथ ही साध्या
काळातही वाट दाखवणारी |
उनाड वाऱ्यासारखी अशी ही मैत्री असते अंधारातही प्रकाशात नेणारी अशी ही मैत्री असते।

-कवायत्री रुपाली निलेश भालेराव 
लोणी बुद्रुक.ता.राहाता
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!