इगतपुरी बोधिवती देहाडे तालुक्यातील खंबाळे जिल्हा परिषद शाळेत पात्रता असलेल्या शिक्षक नाही त्यामुळे येथील विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत अजूनही शासन प्रशासनाला विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याची काळजी नाही का? असा संतप्त सवाल पालकांकडून विचारला जात आहे.
या नुकसानाची भरपाई कोण देणार,मागील गेल्या तीन ते चार महिन्यांपासून सातत्याने पाठपुरावा करत असून सुद्धा मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार सह जिल्हा शिक्षणाधिकारी व जिल्हा परिषद नाशिक गट शिक्षणाधिकारी यांच्याकडे पदवीधर शिक्षक नसल्यामुळे तर त्यांचे शैक्षणिक जीवन विस्कळीत झाले आहे..ऐन वेळेवर विद्यार्थ्यांच्या परीक्षा तोंडावर येत असून सुद्धा सहा,सहा महिने प्रशासनाला शिक्षण उपलब्ध होत नाही. ही मोठी शोकांकिका व्यक्त होत आहे..
जिल्हा परिषद शाळेत शिक्षकांचा तुटवडा मागील वेळेस संतप्त पालकांनी कुलूप बंद आंदोलनाचा इशारा देऊन सुद्धा अद्यापही प्रशासनाच्या वतीने कोणत्याही प्रकारची कार्यवाही करण्यात आलेली नाही. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान मोठ्या प्रमाणावर झालेले असून या मुलांचे भवितव्याच्या जबाबदारी कोण घेणार असा संतप्त सवाल त्या विद्यार्थ्यांच्या पालकांकडून होत आहे.
पालकांकडून लेखी निवेदन देऊन तीन महिने उलटून गेले त्यावेळी तोंडी आश्वासन देऊन आम्ही याची पूर्तता करू असे आश्वासन दिले होते परंतु त्याबद्दल आजतागायत कुठलीही कारवाई झालेली नाही त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये संताप निर्माण होत आहे.
