जगण्यातलं वास्तव आयुष्य.

Cityline Media
0


जीवन हे जगणं असतं, 
तुमचं आमचं सेम दिसणार नक्कीच नसतं,

जगताना चौकटीच्या पलीकडे जाऊन जगता आलं पाहिजे,
 येणारा प्रत्येक क्षण हा आनंदाने अनुभवता आला पाहिजे,

 हसणाऱ्या चेहऱ्यावरही चिंतेचे सावट असते, 
सावरलेल्या दुःखालाही किनार सुखाची असते, 

आनंदाची फुले वेचताना काटेही टोचणारे आहेत, 
त्यांना बाजूला सारून फुले वेचण्याची कला मात्र आपली आहे, 

जीवन हे जगणं असतं, जीवन हे असंच असतं, 
येणारा प्रत्येक दिवस नवीन धडा शिकवून जातो, 

पुस्तकाच्या पानाप्रमाणे अनुभवांचे पान आपण पालटत जातो, 
उणे दुणे कोणाचे असू नये मनी, आनंदाने जगणे असू द्यावे ध्यानी, 

आयुष्याचे कोडे न सुटणारे असते, 
ती सोडवताना मात्र आनंदाने जगायचं असते !

रुपाली निलेश भालेराव
लोणी बुद्रुक ता.राहाता
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!