संगमनेर प्नतिनिधी राज्यातील महायुती सरकारच्या वतीने तसेच आ.अमोल खताळ यांच्या पाठपुराव्याने संगमनेर शहरातील रस्ते विकासासाठी रस्ते अनुदान योजनेतून सुमारे ५० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहीती शिवसेनेच्या नगरसेविका सौ.साक्षी सुर्यवंशी यांनी दिली.
महायुती सरकारने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार जिल्ह्याचे पालक मंत्री ना.राधाकृष्ण विखे यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील महानगरपालिका तसेच नगरपालिकांना द्यावयाच्या मोटार वाहन कराच्या अभिहस्तांकित रकमा रस्ता अनुदान १५७.६० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.यामध्ये संगमनेर शहरातील रस्त्याकरीता निधी मिळावा म्हणून आ.अमोल खताळ यांनी शासनाकडे पाठपुरवा केला होता.त्यामुळे ५०लाख रुपयांचा निधी उपलब्ध होणार असल्याचे नगरसेविका साक्षी सूर्यवंशी म्हणाल्या.
शासन निर्णयानूसार वितरीत करण्यात येत असलेल्या सर्व निधीचे नियंत्रण जिल्हाधिकारी यांच्या मार्फत केले जाणार आहे.सर्व रस्त्यांची काम सार्वजनिक ठिकाणीच करण्यात येणार असून,यामुळे नागरीकांच्या प्राथमिक सुविधांची काम करता येतील.
शहराच्या विकासासाठी आ.अमोल खताळ यांनी सातत्याने विविध योजनांच्या माध्यमातून निधीची उपलब्धता करून दिली आहे.भविष्यात शहराच्या सर्वागीण विकासासाठी महायुती कटीबध्द राहून काम करणार असल्याचे साक्षी सुर्यवंशी यांनी सांगितले.
