संगमनेर प्नतिनिधी औद्योगिक आणि व्यवसाय शिक्षणासाठी दर्जाकिंत असलेल्या संगमनेर येथील अमृतवाहिनी आय.टी.आय.अमृतनगर येथे टाटा मोटर्स पॅसेंजर कार पुणे येथील नामांकित कम्पनींचा कॅम्पस इंटरव्ह्यू नुकताच पार पडला असुन त्यात २०५ विद्यार्थ्यांची अंतिम परीक्षेपूर्वी टाटा मोटर्स पॅसेंजर कार पुणे कंपनीमध्ये निवड झाल्याने संस्थेने आपला दर्जा अधोरेखित केला आहे.
टाटा मोटर्सचे एच.आर.व्यवस्थापक अक्षय जाधव,एच. आर.कार्यकारी प्रसन्न जेधे.एच.आर.कार्यकारी.निलेश भाकरे यांनी अंतिम वर्षाच्या मेकॅनिक मोटर व्हेईकल, मेकॅनिक डिझेल, फिटर, इलेक्ट्रिशियन, वायरमन, कॉम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंट या ट्रेडच्या विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या,त्यापैकी एकूण २०५ विद्यार्थ्यांची निवड झाल्याबद्दल संस्थेने समाधान व्यक्त केले.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च गुणवत्तेचे शिक्षण मिळावे, यासाठी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी अमृतवाहिनी आय.टी.आय.ची स्थापना १९८४ साली केली. संस्थेने गुणवत्तेत सातत्य राखल्याने संस्थेचा नावलौकिक वाढला आहे.येथील शैक्षणिक वातावरण, निसर्ग सुंदर परिसर, शिस्त, स्वच्छता तसेच विद्यार्थ्यांना प्लेसमेंट व आधुनिक सुविधा उपलब्ध आहेत.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष मा.शिक्षणमंत्री. बाळासाहेब थोरात, विश्वस्त.डॉ.सुधीर तांबे, विश्वस्त सौ.शरयू देशमुख,मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, संचालक शैक्षणिक डॉ.जे.बी.गुरव,आय.टी.आय.चे प्राचार्य.व्ही.व्ही.भाटे व नामदेव गायकवाड यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. मुलाखती यशस्वी होण्यासाठी ट्रेनिंग व प्लेसमेंट विभाग व सर्व कर्मचारी वृंद यांनी विशेष परिश्रम घेतले आहे.
