इगतपुरीत नशीब बदलणाऱ्या भोंदू मायलेकीनी केली हायप्रोफाइल लोकांची आर्थिक फसवणूक

Cityline Media
0
सामान्य महिलांकडून तक्रार निवेदन दाखल; गुन्हा दाखल करण्याची मागणी

नाशिक दिनकर गायकवाड नाशिक जिल्ह्यातून महाराष्ट्राचा एफस्टीन उदयास आल्यानंतर जिल्ह्यासह महाराष्ट्रातील अनेक भोंदू बाबांचे धाबे दणाणले तर अनेक जण पुरावे नष्ट करण्याच्या तयारीत आहे त्याचाच एक प्रत्यय म्हणून काय? नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील तळेगाव येथे अशाच एका भोंदू मायलेकींनी अनेक हायप्रोफाईल लोकांना घोळात घेत जादूटोणा,भूतबाधा आजार बरा करणे नशिब बदलणे या प्रकारातून कोटीची संपत्ती जमा केली असून यात अनेक पोलिसांच्या महिलांचे पैसे देखील अडकले असल्याचे बोलले जातेय त्यामुळे भोंदू मायलेकी विरोधात कुणी जात नाही तर कारवाई करण्यासाठी देखील कुणी धजावत नाही सद्य या प्रकरणात दोन महिला पुढे येऊन त्यांनी वरिष्ठ पोलिस निरीक्षक तालुका पोलिस ठाणे इगतपुरी येथे याबाबत तक्रार निवेदन दाखल केले आहे.
इगतपुरी येथील महिला आणि नाशिक मधील पीडित महिलांची ‌या प्रकरणात फसवणूक झाल्याने त्यांनी सामाजिक कार्यकर्त्यांच्या सोबतीने दाखल केलेल्या तक्रार निवेदनात म्हटले आहे की इगतपुरी तालुक्यातील तळेगाव येथील वैशाली किशोर बैरागी,व तिची आई रत्ना माळी,

या भोंदू महिलांनी भुतबाधा काढणे,आजार बरा करणे, नशीब बदलणे,पुजा करणे अशा गोष्टी सांगुन माझा विश्वास संपादन केला,त्यानंतर विविध कारणे सांगुन माझेकडून वेळोवेळी एकूण रक्कम रुपये पंचावन्न हजार व माझी नाशिक रोड येथील बहिण ,

हिचेकडून पसतीस हजार तसेच माझी इगतपुरीची मैत्रीण यांचेकडून देखील पंचवीस हजार रुपये तसेच इतर अनेक लोकांकडून मोठ्या प्रमाणात रक्कम वसुल केल्या त्यांच्या उपचार पद्धतीचा कोणत्याही प्रकारचा परिणाम व फायदा झाला नाही,व आमच्याकडे आणखी रक्कम मागण्यात आली, त्यामुळे मला फसवणुक झाल्याचे लक्षात आले. त्यामुळे माझी मैत्रीण व माझी बहिण यांनी देखील भोंदू महिलांच्या उपचारांचा परिणाम जाणवत नसल्याचे तक्रार महिलेने सांगितले.

त्यामुळे आम्ही संबधित माय लेकींकडे आमचे पैसे परत करा अशी मागणी केली असता, त्या म्हणाल्या की आम्ही पैसे देणार नाही असे बोलुन आम्हास अश्लील शिवीगाळ केली आणि आमचे संबंध कुठपर्यंत आहे यांचे परिणाम गंभीर होतील अशी धमकी देत आम्ही तुमच्या कुटूंबाची वाट लावून टाकीन असे सांगितले संबंधीत व्यक्ती आम्हास जीवे मारण्याची देखील धमकी देत आहेत.

ते रागीट,आडदांड स्वभावाचे असल्याने अशी कृती करण्यास ते मागे पुढे बघणार नाहीत.त्यामुळे संबंधीत व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करून कारवाई करावी व आमच्या सारख्या इतर कोणावर अन्याय व फसवणुक होऊ म्हणून संबंधीतांवर कठोरात कठोर कारवाई करून गुन्हा नोंदविण्यात यावा.

या तक्रार निवेदनाच्या प्रती अंधश्रद्धा निर्मुलन व वैज्ञानिक दृष्टीकोन प्रबोधन समिती,नाशिक समाज कल्याण आयुक्त नाशिक जिल्हाधिकारी नाशिक पोलीस अधिक्षकआडगांव,नाशिक. विशेष पोलीस निरीक्षक नाशिक.यांना देण्यात आल्या आहेत.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!