श्रीरामपूर दिपक कदम विवाहासाठी योग्य वधू वर निवडताना केवळ सौंदर्य न बघता शिक्षण व धार्मिकता या गुणांस प्राधान्य द्यावे असे प्रतिपादन सेवानिवृत शिक्षण विस्तार अधिकारी मंगला गायकवाड यांनी केले.
श्रीरामपूरमध्ये नुकतेच स्व. दादाभाऊ भोसले प्रतिष्ठानाने आयोजित केलेल्या १७१ व्या ख्रिस्ती वधू-वर परिचय मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी गायकवाड बोलत होत्या. कुटुंबात शांती,प्रेम आणि स्थिरता टिकवून ठेवण्यासाठी प्रार्थनेला अधिक महत्व देण्याचेही आवाहन देखील त्यांनी केले.
याप्रसंगी याप्रसंगी रेव्ह.सूर्या गजभिव म्हणाले कि, विवाहसंस्था ही देवाने निर्माण केलेली असून वैवाहिक आयुष्य जगताना पती पत्नीने एकमेकांच्या आधीन असावे. मुलामुलींच्या पसंती नंतर विवाहासाठी अंतिम निर्णय घेताना पालकांची भूमिका महत्वाची असावी असे मत रेव्ह. दत्ता अमोलिक यांनी यावेळी व्यक्त केले.
सी.एन.आय.च्या मा.महिला अध्यक्षा शिल्पा सिंग मार्गदर्शन करताना म्हणाल्या कि,विवाह जुळवताना आई वडिलांच्या भौतिक दोषाकडे न बघता मुलामुलींच्या भविष्याकडे अधिक लक्ष द्यावे.यावेळी अपंग सामाजिक संस्थेचे अध्यक्ष संजय साळवे म्हणाले कि, विवाह जुळवताना व विवाह संस्कारापूर्वी संबंधित धर्मगुरूंना दोन्हीही कुटुंबाची माहिती देणे अत्यंन्त आवश्यक आहे.
बहूचर्चीत चालू असलेल्या या सेवाभावी उपक्रमास विधानभवन सदस्य हेमंत ओगले,नगराध्यक्ष करण ससाणे व जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष सचिन गुजर यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून विवाहेच्छूकांना शुभेच्छा दिल्या.
या सामाजिक उपक्रमात अहिल्यानगर जिल्ह्यासह जालना, संभाजीनगर,नाशिक,पुणे व इतर जिल्ह्यातल्या विवाहेच्छुकांची १७० हुन अधिक उपस्थिती दिसून आली.समाजमान्य ख्रिस्ती वधू वर मेळाव्यात सुरुवातीचे प्रास्ताविक मा.मुख्याध्यापक श्री.गायकवाड यांनी केले तर संयोजक श्रीधर भोसले यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी दिपक कदम,अनिल धिवर,याकोब लोंढे,गोपीनाथ चक्रनारायण,सुभाष कदम, विजय कदम आदींनी परिश्रम घेतले.
