श्रीरामपूर दिपक कदम श्रीरामपूरचा जातीय सलोखा बिघडवून शांतता भंग करण्याचा काहींचा प्रयत्न आहे त्यांचा तातडीने बंदोबस्त करावा या मागणीसाठी काँग्रेसचे आमदार हेमंत ओगले यांनी नुकतीच पोलीस प्रशासनाची भेट घेऊन यासंदर्भातील निवेदन सुपूर्द केले.
श्रीरामपूरमध्ये भर बाजार पेठेत मारामारी,मिरवणूकवर दगडफेक,गावठी कट्ट्यांसह वापर करून दहशत माजवणे, खंडणी वसूल करणे,रक्तपात करणे आदी घटनांमुळे सामान्य नागरिक दहशतीखाली जगत आहेत.पोलीस प्रशासनाने या सर्व गोष्टींचा बंदोबस्त करून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कठोर कार्यवाही करावी अन्यथा रस्त्यावर उतरून प्रशासन विरोधात आवाज उठवला जाईल असा इशारा यावेळी दिला.
यावेळी आमदार हेमंत ओगलेंसह श्रीरामपूर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष करण ससाणे,जिल्हाध्यक्ष सचिन गुजर,मा.सभापती बाबासाहेब दिघे,उपाध्यक्ष ज्ञानेश्वर मुरकुटे, सभापती सुधीर नवले, तालुकाध्यक्ष प्रमोद भोसले, शहराध्यक्ष अण्णासाहेब डावखर,व्यापारी असोसिएशनचे राहुल कोठारी,गटनेते मुजफ्फर शेख,दिलीप नागरे यांच्यासह श्रीरामपुरातील नगरसेवक, व्यापारी,डॉक्टर,वकील यांच्यासह प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
