अरणगाव येथे शिवसेना शिंदे गट शाखेचे उद्घाटन

Cityline Media
0
अहिल्यानगर प्रतिनिधी शिवसेना पक्षप्रमुख महाराष्ट्र राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री तथा पक्ष प्रमुख एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार अहिल्यानगर जिल्ह्यातील अरणगाव शेळके येथे शिवसेना शाखेचे उद्घाटन उपजिल्हाप्रमुख आनंद शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतेच करण्यात आले.
सामाजिक न्याय विभागाचे दक्षिण जिल्हाप्रमुख विनोद साळवे यांच्या हस्ते शिवसेना शाखेचे उद्घाटन करण्यात आले यावेळी पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेनुसार गाव तेथे शाखा व घर तेथे शिवसैनिक हे अभियान अहिल्यानगर तालुक्यासह दक्षिण अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये विनोद साळवे हे राबविणार आहे.

यावेळी येथे शाखेचे नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या यावेळी व्यासपीठावर उप तालुकाप्रमुख अंबादास कलापुरे डॉक्टर सेलचे महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष डॉ.करणसिंह गाडे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

यावेळी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते शाखा पदाधिकाऱ्यांच्या पदनियुक्त प्रदान करण्यात आल्या तसेच सामाजिक न्याय विभागाचे पदाधिकारी यांच्या नियुक्ती जाहीर करण्यात आल्या यावेळी संतोष जगनाथ केदारे यांना तालुकाप्रमुख व उपजिल्हाप्रमुख  बाळासाहेब रोहिदास भिंगारदिवे यांची नेमणूक करण्यात आली.

यावेळी शाखाप्रमुख बाबासाहेब शेळके, उपशाखाप्रमुख अर्जुन शेळके, शाखा सचिव शिवा शेळके आदी प्रमुख पदे उपजिल्हाप्रमुख आनंद शेळके यांनी जाहीर केले असून शिवसेना पक्षाच्या माध्यमातून प्रत्येक घटकातील नागरिकांपर्यंत शासकीय योजना सह विविध शासनाचे उपक्रम नागरिकापर्यंत पोहोचवणारा असून गाव तिथे शाखा व घर तिथे शिवसैनिक या अभियान राबवणार असल्याची माहिती शिवसेना सामाजिक न्याय विभागाचे दक्षिण जिल्हाप्रमुख विनोद साळवे यांनी सांगितले.

यावेळी उपजिल्हाप्रमुख आनंद शेळके म्हणाले की एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाच्या काळामध्ये लाडकी बहिण,शेतकरी, शेतमजूर,बेरोजगार तरुण, मुख्यमंत्री सहायता निधी, मुख्यमंत्री सन्मान योजना,आदी प्रमुख उपक्रम सुरू केले असून या उपक्रमाचा नागरिकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन  केले.

आभार प्रदर्शन उपतालुकाप्रमुख अंबादास कलापुरे यांनी मांडले. यावेळी अर्जुन मामा कार्ले,रावसाहेब गोंडाळ,विक्रम शेळके,दत्तात्रय काल्हापुरे, काशिनाथ शेळके,तेजस काल्हापुरे, वैभव काल्हापुरे,अक्षय शेळके,सोन्या बापू शेळके, भाऊ शेळके, विनायक गहिले,अमोल परभने भैया लांडगे, गणेश शेळके, ज्ञानदेव शेळके,दुर्गेश शेळके, खंडू शेळके हरीश शेळके,अमोल बनसोडे,दिपक कांबळे,सतीश वाघ,सोमनाथ लांडगे,आदी सह सर्व शिवसैनिक उपस्तित होते.

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!