राहुरी विधानसभा मतदारसंघात रिपब्लिकन पक्षाची मोठी ताकद असून रिपब्लिकन पक्षाने या मतदारसंघांमध्ये पक्षाचे राष्ट्रीय नेते डॉ.राजेंद्र गवई यांच्या आदेशानुसार उमेदवारांची सुरू केली असून पक्षाच्या वतीने लवकरच राहुरी येथे इच्छुक उमेदवाराच्या मुलाखती पक्षाचे राष्ट्रीय नेते डॉ. राजेंद्र गवई यांच्या उपस्थितीत मुलाखती घेणार आहे.
यामध्ये पाथर्डी नगर राहुरी विधानसभा मतदारसंघात या तीनही तालुक्यातून इच्छुक उमेदवाराची संक्षिप्त माहिती मुंबई येथील रिपब्लिकन पक्षाच्या संपर्क कार्यालयामध्ये दक्षिण जिल्हा संपर्क प्रमुख सुशांत मस्के जिल्हाध्यक्ष सुधाकर रोहम यांनी परिचय पत्र उमेदवारांचे पाठवले आहे.
त्या अनुषंगाने रिपाई नेते डॉ. राजेंद्र गवई येत्या पंधरा दिवसांमध्ये राहुरी शहरात येऊन राहुरी तालुक्यामध्ये पक्षाचा मोठा मेळावा घेणार आहे व या मेळाव्यातूनच उमेदवाराची चाचपणी करून निवडणुकी रणशिंग येथून सुरू करणार आहे.
रिपब्लिकन पक्षाच्या वतीने पाथर्डी नगर राहुरी या तीनही तालुक्यातून असणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती गणातून प्रत्येक गावामध्ये संपर्क अभियान सुरू केले असून राहुरी तालुक्यातील प्रत्येक गावांमध्ये नागरिकांच्या भेटीगाठी समस्या आधी गोष्टीवर कार्यकर्त्यांनी भर दिली.
राहुरी तालुक्याचा अपूर्ण राहिलेल्या विकास नगर मनमाड रस्ता चौपदरीकरण सूतगिरणी राहुरी सहकारी साखर कारखाना बंद पडलेल्या शिक्षण संस्था आधी सुरू करण्याकरिता रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून राहुरी तालुक्याचा विकास करण्याकरिता ही निवडणूक ताकतीनिशी लढणार असल्याची माहिती रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय नेते डॉ. राजेंद्र गवई महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जकाप्पा कांबळे अहिल्यानगरचे जिल्हा सरचिटणीस दादू विष्णू यादव संपर्कप्रमुख उत्तम साळवे संगमनेर तालुकाध्यक्ष साहेबराव यादव यांनी केले आहे
