झरेकाठी सोमनाथ डोळे संगमनेर तालुक्यातील झरेकाठी येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर संस्थापित दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाची ग्रामशाखा मोठ्या उत्साहात स्थापन करण्यात आली.
या सामाजिक उपक्रमामुळे गावामध्ये सामाजिक, शैक्षणिक व बौद्धिक चळवळीला नवे बळ मिळणार आहे.या ग्रामशाखेच्या उद्घाटन समारंभात प्रमुख मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून बुद्ध वंदना करून तसेच पंचशील ध्वज फडकवून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.उपस्थित मान्यवरांनी आपल्या भाषणातून समाजातील एकता,बंधुता आणि शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले.
प्रसंगी ग्रामशाखेची कार्यकारणी जाहीर करण्यात आली अध्यक्ष, उपाध्यक्ष,सचिव,सहसचिव, खजिनदार तसेच इतर सदस्यांची निवड सर्वानुमते करण्यात आली मान्यवरांनी नवनिर्वाचित ग्रामशाखेच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या विचारांचा प्रसार प्रत्येक गावापर्यंत पोहोचवणे ही काळाची गरज आहे.” तसेच सर्व पदाधिकाऱ्यांना प्रामाणिकपणे काम करून समाजहितासाठी कार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.यावेळी नव्याने निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांनी सामाजिक समतेचा आणि बौद्ध धम्माच्या तत्वांचा प्रचार-प्रसार करण्याचा संकल्प केला. झरेकाठी येथे स्थापन झालेली ही ग्रामशाखा भविष्यात सामाजिक परिवर्तनाचे केंद्र ठरणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.
कार्यक्रमाचे आयोजन शिस्तबद्ध पद्धतीने पार पडले असून शेवटी आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
