म्हैसगाव कमलेश विधाटे स्वराज्याचे संस्थापक,रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राहूरी येथील पुतळ्याची विटंबना होऊन आज बरोबर एक वर्ष पूर्ण झाले पण जखम अजूनही ताजी आहे. परंतु पोलीसांचा याबाबतचा तपास संथगतीने सुरू आहे.
२६ मार्च २०२५ राहुरी शहरासाठी हा दिवस केवळ एक तारीख नाही,तर स्वाभिमानाला लागलेला डाग आहे.त्या दिवशी दुपारी अडीचच्या सुमारास बुवा सिंध बाबा तालीम येथे ठेवलेल्या शिवरायांच्या पुतळ्याला काळ फासण्यात आला आणि काही क्षणातच संपूर्ण शहर,नंतर राज्य संतापाने पेटून उठले.
घडलेल्या घटनेने केवळ एक पुतळा नाही, तर संपूर्ण समाजाच्या भावना जखमी केल्या. अठरापगड जातींना एकत्र आणून स्वराज्य उभारणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांना काळे फासण्याचा हा प्रकार होता. शेत शेतकऱ्यांच्या मिरचीच्या देठालाही धक्का लागणार नाही, अशी ग्वाही देणाऱ्या राजांच्या
महाराष्ट्रातच त्यांच्या प्रतिमेची विटंबना झाली हीच सर्वात मोठी शोकांतिका ठरली.
घटनेनंतर राहरीत आणि परिसरात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या रस्ता रोको,आंदोलने,उपोषण प्रत्येक माध्यमातून नागरिकांनी आपला संताप व्यक्त केला.
राजकीय नेते,सामाजिक कार्यकर्ते,सर्वसामान्य नागरिक सर्वजण रस्त्यावर उतरले आश्वासने देण्यात आली, आरोपींना लवकर अटक होईल असे सांगण्यात आले.पण काळ सरकत गेला,आणि आश्वासने फक्त शब्दांतच राहिली.
आज या घटनेला बरोबर एक वर्ष पूर्ण झाले आहे. मात्र,सर्वात मोठा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे.आरोपी कोण? हा प्रश्न फक्त पोलिस तपासाचा नाही. तर हा प्रश्न आहे व्यवस्थेच्या संवेदनशीलतेचा,इच्छाशक्तीचा आणि जबाबदारीचा.एका सामान्य गुन्ह्याचा तपास काही दिवसांत होऊ शकतो मग इतक्या गंभीर आणि संवेदनशील प्रकरणाचा तपास वर्षभर प्रलंबित कसा?वर्ष उलटले पोलिस तपास अजूनही पूर्णत्वास गेलेला नाही.
यामुळे राहुरीकरांमध्ये नाराजी,असंतोष आणि वेदना दाटून आल्या आहेत.महाराज आम्हाला माफ करा आज राहुरीतील प्रत्येक शिवप्रेमीच्या मनात एकच भावना आहे महाराज,आम्हाला माफ करा कारण ज्या भूमीत तुमच्या विचारांनी स्वाभिमान जागवला, त्याच भूमीत तुमच्या प्रतिमेचा अपमान झाला आणि एक वर्ष उलटूनही दोषींना शिक्षा झाली नाही.ही घटना फक्त राहुरी पुरती मर्यादित नाही, तर संपूर्ण
विटंबनाप्रकरणी प्राजक्त तनपुरेंचा संताप
राहुरी शहरातील बुवासिंदबाबा तालीम परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना झालेल्या घटनेला एक वर्ष पूर्ण झाले असून,या प्रकरणातील आरोपी अद्याप मोकाट असल्याने मा.मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
या घटनेला वर्ष उलटूनही तपास यंत्रणांकडून ठोस कारवाई झालेली नाही, ही अत्यंत गंभीर बाब असून महाराष्ट्राच्या अस्मितेशी संबंधित विषयात अशी निष्क्रियता अस्वीकार्य असल्याचे तनपुरे यांनी म्हटले आहे.छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान आहे.
अशा कृत्या मागील आरोपी अजूनही मोकाट आहेत, हे दुर्दैवी आहे.नेमके कोणाला वाचवले जात आहे? तपास का थांबवला गेला आहे?असे थेट प्रश्न त्यांनी उपस्थित केले. तसेच,या प्रकरणातील दोर्षीना तात्काळ अटक करून कठोर शिक्षा करण्यात यावी,अशी ठाम मागणीही त्यांनी केली. जनतेच्या भावना दुखावणाऱ्या या घटनेत विलंब न लावता न्याय मिळावा,अन्यथा आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला.
दरम्यान, या प्रकरणात अद्यापही ठोस प्रगती न झाल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण असून, प्रशासनाने लवकरात लवकर कारवाई करावी अशी मागणी तनपुरेंनी केली आहे.समाजाच्या अस्मितेचा प्रश्न आहे. न्याय मिळेपर्यंत ही वेदना शांत होणार नाही. आजही तोच प्रश्न उभा आहे.की,शिवरायांच्या अपमानाला न्याय कधी मिळणार ? एक वर्षानंतरही जर तपास सुरू असेल,तर तो तपास नसून प्रशासनाची अपयशाची कबुली आहे.आरोपी सापडत नाहीत की सापडू दिले जात नाहीत? हा प्रश्न आता सामान्य नागरिकांच्या मनात उघडपणे
