राहुरी तालुक्याच्या पश्चिम भागात अवकाळी पावसाने शेतकरी हवालदिल

Cityline Media
0
कांदा,मका, गहू, भाजीपाला पिके भुईसपाट; तात्काळ नुकसान भरपाईची मागणी

राहुरी कमलेश विधाटे राहुरी तालुक्याच्या पश्चिम भागात झालेल्या अवकाळी पाऊस,जोरदार वारे व गारपीठीचा तडाखा बसत असून दरडगाव थडी,म्हैसगाव, कोळेवाडी,शेरी,चिखलठाण या गावांमध्ये शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी वर्गावर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे.
गारपीठीमुळे कांदा,मका,गहू, टरबूज,खरबूज,टोमॅटो यांसारखी पिके पूर्णपणे भुईसपाट झाली आहेत. कापणीच्या टप्प्यावर आलेली पिके नष्ट झाल्याने शेतकऱ्यांच्या हातात आलेला घास हिरावला गेला आहे.अचानक बदललेल्या वातावरणामुळे आलेल्या या संकटाने शेतकरी दुहेरी अडचणीत सापडला आहे.

शेतातील उभ्या पिकांवर गारांचा जबरदस्त मारा झाल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले असून अनेक शेतकरी हवालदिल झाले आहेत.कष्टाने उभी केलेली पिके काही मिनिटांत नष्ट झाल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले आहेत.या पार्श्वभूमीवर शासनाने तात्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्यावी,अशी मागणी जोर धरत आहे.

पंचनामा प्रक्रियेला विलंब न करता सरसकट नुकसान जाहीर करून पश्चिम भागातील शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक मदत देण्यात यावी,अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.सध्या आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने तातडीने निर्णय घेणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

या पाऊस व गारपीठीमुळे  उघड्यावर असलेले मुक्या प्राण्यांची त्यामध्ये गाय ,बैल , शेळ्या मेंढ्या,म्हैसगाव शासनाने दिले गाय गोठे ,शेळ्याचे शेड ,कुकुट पालन शेड पासुन म्हैसगाव वंचीत राहिले आहे म्हणून या मुक्या प्राण्यांना पाऊस व गारपीठला सामोरे जावे लागत आहे यामधील काही पशुधनासही प्राण गमवा लगणार आहे असे दिसुन येत आहे.

म्हैसगाव एक ही शासकीय काम झाले नाही त्यामुळे पुढे होते का? नाही याची कल्पना देखील करवत नाही अनेक वेळा येथील शेतकऱ्यांनी शासन दरबारी मदतीची याचना केली मात्र त्यांच्या पदरी निराशाच येत आहे.पावसाने शेतीचे व प्राण्याचे ही मोठे नुकसान झाले आहे त्यामुळे येथील शेतकरी हवालदिल झाला आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!