झरेकाठी सोमनाथ डोळे संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथील ॲसिड हल्ल्यातील जखमी रुग्णाची राज्याच्या महिला बालकल्याण मंत्री आदिती सुनील तटकरे यांनी प्रवरा ग्रामीण रुग्णालय लोणी येथे भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली.
वडगावपान येथे घडलेल्या धक्कादायक ॲसिड हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या पीडितेवर सध्या लोणी येथील प्रवरा रुग्णालयात उपचार सुरू आहेत या पार्श्वभूमीवर आदिती मंत्री तटकरे यांनी रुग्णालयात जाऊन पीडितेची प्रत्यक्ष भेट घेतली व तिच्या आरोग्य विषयी माहिती डॉक्टरांकडून जाणून घेतली.
यावेळी त्यांनी संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांशी चर्चा करून पीडितेला सर्वोत्तम उपचार देण्याच्या सूचना दिल्या.तसेच आवश्यक ती सर्व शासकीय मदत देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.घटनेबाबत प्रशासनाकडून सखोल चौकशी सुरू असून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल,असेही मंत्री तटकरे यांनी स्पष्ट केले.या भेटी दरम्यान संगमनेर मतदार संघाचे आमदार अमोल खताळ,पारनेर मतदारसंघाचे आमदार काशिनाथ दाते तसेच, रुग्णालयातील अधिकारी, वैद्यकीय कर्मचारी व स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.
