पालकमंत्री विखे पाटील यांच्या सहकार्याने संगमनेरात सौर उर्जेवरील ४७ हायमॅक्स मंजूर

Cityline Media
0
नागरीकांसाठी पायाभूत सुविधांना महायुतीचे प्राधान्य-आमदार खताळ

भाजपाच्या स्थापना दिनी लोकार्पण

संगमनेर प्रतिनिधी संगमनेर शहरातील प्रभागांकरीता पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सहकार्याने  जिल्हा नियोजन व विकास समितीमधून  सुमारे २ कोटी रुपयाच्या निधीचे ४७ सौर उर्जेवरील हाय मॅक्स दिवे मंजूर करण्यात झाले आहेत.त्यापैकी १४ हायमॅक्स दिव्यांचे काम पूर्ण झाले असून भाजपाच्या स्थापना दिनाच्या निमिताने हायमॅक्सचे लोकार्पण आमदार अमोल खताळ आणि महायुतीच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
शहरातील जनतानगर मधील जिजामाता गार्डन आणि लालतारा हाऊसिंग सोसायटी येथील हायमॅक्स दिव्यांचे प्रातिनिधीक स्वरुपात लोकार्पण करण्यात आले.
संगमनेर विधानसभा मतदार संघात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ.सुजय विखे पाटील आणि आमदार अमोल खताळ यांच्या माध्यमातून जिल्हा नियोजन मधून २०० सौर ऊर्जेवर चालणाऱ्या ऑटोमॅटिक हायमॅक्स दिव्यांना मंजुरी मिळालेली आहे.

ह्यातील शंभर हाय मॅक्स दिवे बसून पूर्ण झाले आहेत उर्वरित हायमॅक्स दिव्यांचे काम प्रगतीपथावर सुरू आहे. या हायमॅक्स दिव्यांमुळे परिसरातील नागरिकांना मोठा  सुरक्षेच्या दृष्टीने मोठा दिलासा मिळाला आहे.विशेष म्हणजे हायमॅक्स पूर्णपणे सौर उर्जेवर असल्याने वीजबीलाचा कोणताही भार स्थानिक संस्थेवर येणार नाही.

संध्याकाळी सात वाजता आपोआप दिवे सुरू होतात.त्यामुळे वीज वितरण कंपनीचा वीज पुरवठा खंडीत झाला तरी सौरऊर्जेवरील दिव्यांची सुविधा नागरीकांना मिळणार आहे. लोकार्पण सोहळ्यास मुख्याधिकारी दयानंद गोरे, नगरसेविका साक्षी सूर्यवंशी,

शिवसेना शहराध्यक्ष विनोद सूर्यवंशी, भाजप शहराध्यक्ष पायल ताजणे, भाजप सरचिटणीस भारत गवळी, आर पी आय शहराध्यक्ष कैलास कासार, राजू गायकवाड, सौ. संगिता गवळी, राहुल म्हस्के,फुलचंद गांधी, सुरेश गवळी, शिवाजी अंभंग, वैभव आंडगळे, हौसाबाई आंडगळे, मच्छिंद्र वाबळे, दिलीप रावल, शोभा घुले, सुलोचना गायकवाड, राहुल भोईर, शशांक नामन, वरद बागुल, सागर भोईर यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना आमदार अमोल खताळ म्हणाले की, शहराच्या विकासाला महायुती सरकारच्या माध्यमातून निधी उपलब्ध होत आहे.शहराच्या विकासाला निधीची कमरता भासू दिली जाणार नाही. नागरीकांच्या मुलभूत सुविधांना आमचा प्राधान्यक्रम असून, शहरातील रस्त्यांच्या दुरुस्ती साठी उपमुख्यमंत्री व नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून ५० लाख रुपये मंजूर होऊन वर्ग झाले आहेत. नमो गार्डन सुद्धा मंजूर झाले आहेत संगमनेर शहरातील जनतेच्या पाठीमागे महायुती सरकार भक्कम उभे आहे संगमनेर नगरपालिकेमध्ये शिवसेना महायुतीचा नगरसेवक एक असला तरी इतर  सर्व पदाधिकारी कार्यकर्ते जनसेवक म्हणून काम करतील आणि शहरातील नागरिकांच्या अडीअडचणी सोडवतील आशी ग्वाही आ. अमोल खताळ यांनी दिली.

भाजपाच्या शहर अध्यक्षा सौ.पायल ताजणे यांनी पालकमंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून उपलब्ध झालेल्या हायमॅक्सचे लोकार्पण भाजपाच्या स्थापना दिनी होत आहे.लोकांच्या राष्ट्रहित आणि लोकांच्या  हितासाठी काम करणारा पक्ष म्हणून भारतीय जनता पक्ष काम करतो.शहराच्या विकासाला पुढे घेवून जाण्यासाठी पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील आणि आ.अमोल खताळ यांच्या माध्यमातून भविष्यात अधिक विकास काम पूर्ण करण्यासाठी आमचा प्रयत्न करणार असल्याचे सौ.ताजणे म्हणाल्या.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!