खडकेवाके येथे भिमजयंती उत्साहात साजरी

Cityline Media
0
समता जयंती उत्सव समिती व ग्रामस्थांच्या वतीने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे आयोजन


खडकेवाके प्नतिनिधी राहता तालुक्यातील खडकेवाके येथे समता जयंती उत्सव समिती व ग्रामस्थांच्या वतीने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी गावच्या प्रथम नागरिक महिला सरपंच संगीता मुरादे यांच्या हस्ते डॉ.सर्व महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून सामाजिक ऐक्याचे दर्शन झाले.त्यानंतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम झाले विद्यार्थ्यांच्या कार्यक्रमातून बाबासाहेब आंबेडकरांनी समाजासाठी दिलेला संदेश लोकांपर्यंत पोहोचला.

प्रसंगी शाळेतील मुलांना खाऊ वाटप करण्यात आले.यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त गावातील सर्व तरुणांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचं दर्शन करून दिले. यावेळी खडकेवाके गावचे प्रथम लोकनियुक्त सरपंच सचिन मुरादे,सोसायटीचे उपाध्यक्ष जालिंदर मुरादे, ग्रामपंचायतचे उपसरपंच दिपक गायकवाड, 

समता जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष संदेश गायकवाड, भीमशक्ती जिल्हा उपाध्यक्ष अनिल गायकवाड,पवन गायकवाड ,रवी गायकवाड, सचिन गायकवाड, बंटी गायकवाड, संदीप गायकवाड, अनिल गायकवाड,दीपक गायकवाड, सोनू तूपलोंढे, आकाश गायकवाड, बाबासाहेब गायकवाड,आबासाहेब गायकवाड,

रावसाहेब लावरे, नवनाथ माळी,रतन गायकवाड, गजानन गायकवाड,नामदेव गायकवाड,संतोष गायकवाड, नानासाहेब गायकवाड, ऋषिकेश गायकवाड,रोहन गायकवाड, राहुल वाळूज, साहिल गायकवाड,शिवनाथ गायकवाड, दशरथ गायकवाड,अरुण गायकवाड, नवनाथ गायकवाड, रामनाथ गायकवाड, योगेश गायकवाड, गौरव गायकवाड,गुलाब पोटे,भूषण आंबेडकर आकाश पिलघर आदीसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ,व महिला, शाळेतील विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपसरपंच दिपक गायकवाड यांनी केले.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!