आश्वी खुर्द प्रतिनिधी बाबासाहेब डॉ.आंबेडकर यांनी केलेले संपूर्ण कार्य स्त्री-पुरुष समानतेच्या दृष्टिकोनातून केले असल्याने,बाबासाहेबांच्या कार्याला पुढे नेण्यासाठी महिलांनी कंबर कसून पुढे यावे,असे प्रतिपादन साधना मुन्तोडे यांनी केले.
संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथे दि बुध्दिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या महिला ग्राम शाखेच्या वतीने भगवान बुद्ध व बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
यावेळी मंचावर आश्वी खुर्द यांच्या सरपंच सौ.अलका गायकवाड, ग्राम शाखा अध्यक्ष पुजा मुन्तोडे, दत्तराज मुन्तोडे, उपसरपंच बाबासाहेब भवर, मा. उपसरपंच संजय गायकवाड उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात दत्तराज मुन्तोडे यांच्या ध्वजारोहणाने झाली.सरपंच सौ.अलका गायकवाड यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला.यावेळी बाबासाहेब भवर,संजय गायकवाड, गणेश भडकवाड यांनी दीप प्रज्वलन व धूप प्रज्वलित केले.
सरचिटणीस राजेंद्र मुन्तोडे यांनी संस्थेच्या कार्याची माहिती दिली. कार्यक्रमात आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात आरुषी मुन्तोडे,सुभजीत मुन्तोडे व श्रेया मुन्तोडे यांनी शाहिरी सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.तर कल्याणी कदम, संगिता मुन्तोडे व वर्षा मुन्तोडे यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याची माहिती सादर केली. अध्यक्षीय भाषणात दत्तराज मुन्तोडे यांनी संस्थेच्या विविध उपक्रमांची माहिती दिली.तसेच आगामी श्रामणेर व बौद्ध धम्म दीक्षा सोहळ्याचे नियोजन स्पष्ट केले आणि उपस्थितांना सहभागी होण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुशिल मुन्तोडे यांनी केले तर आभा रप्रदर्शन सिद्धार्थ मुन्तोडे यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्रीरंग कदम,हर्षल पवार,बबन मुन्तोडे,अलिशा मुन्तोडे,रेणुका मुन्तोडे,पुनम मुन्तोडे,सुधाकर मुन्तोडे, एकनाथ मुन्तोडे,लैला मुन्तोडे, पुनम मकासरे,कावेरी मुन्तोडे, सिध्देश मुन्तोडे,अर्जुन मुन्तोडे,साहिल मुन्तोडे,प्रसाद मुन्तोडे, गौरव मुन्तोडे, तेजस माने, प्रणव मुन्तोडे, यशराज मुन्तोडे यांनी विशेष परिश्रम घेतले.
