स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
संगमनेर प्नतिनिधी शहरात कत्तल करण्यासाठी डांबुन ठेवलेले नऊ गोवंशीय जनावरांची सुटका करून आरोपींकडुन ३,२०,००० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात स्थानिक गुन्हे शाखा यांच्या कारवाईला यश आले.
घडलेल्या घटनेबाबत माहिती अशी की जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी स्थानिक गुन्हे शाखेस अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये गोवंशीय जनावरांची कत्तल करणारे ठिकाणांची व कत्तलीसाठी चालविलेल्या गोवंशीय जनावरांची सुटका करुन आरोपीविरुध्द कारवाई करणेबाबत आदेश दिलेले आहेत.
या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कबाडी यांचे नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेतील पोलिस उपनिरीक्षक दिपक मेढे,पोलीस अंमलदार राहुल द्वारके, राहुल ढोके, चालक चंद्रकांत कुसळकर यांचे पथक तयार करुन या पथकास संगमनेर शहरामध्ये गोवंशीय जनावरांची कत्तल करणारे इसमांची माहिती काढुन कारवाई करणेबाबत सुचना व मार्गदर्शन करुन पथकास रवाना केले.
नुकतेच संगमनेर शहरात कत्तलखान्याची माहिती घेत असतांना पथकास गुप्त खबऱ्यामार्फत इसम नामे मोहम्मद अली कुरेशी रा.भरतनगर संगमनेर हा संगमनेर शहरातील मदीनानगर येथील गौसेरजा मस्जीद मागे पत्र्याचे शेडमध्ये गोवंशीय जनावरांची कत्तल करण्याचे उद्देशाने निर्दयतेने बांधुन ठेवले असल्याची माहिती प्राप्त झाली.
या माहितीप्रमाणे पथकाने तात्काळ बातमीतील ठिकाणी जावुन खात्री केली असता. पत्र्याचे शेडमध्ये काही जिवंत गोवंश जनावरे हे चारा पाण्याविना निर्दयतेने बांधुन ठेवलेले दिसुन आले.पथकाने या ठिकाणी असलेल्या इसमास ताब्यात घेवुन त्यास त्याचे नांव गांव विचारता त्याने त्याचे नावे१) मोहम्मद अली अब्दुल अली कुरेशी वय-३३ वर्षे रा. भारतनगर,संगमनेर ता.संगमनरे असे असल्याचे सांगितले.
ताब्यातील इसमांकडुन ३,२०,००० रुपये किमतीचे नऊ गोवंशीय जनावरे, असा एकुण ३९,१०,०००- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
आरोपीविरुध्द संगमनेर शहर पोलीस ठाणे गु.र.नं. २७४/२०२६ महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियम सन १९९५ चे सुधारीत २०१५ चे कलम ५, (अ),१, ९ सह प्राण्यांना निर्दयतेने वागविणेचे कलम ३, ११ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास संगमनेर शहर पोलीस ठाणे करीत आहे.जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी ही कारवाई केली आहे.
