प्रवरेच्या पॉलिटेक्निकल विद्यार्थ्यांचे सुयश

Cityline Media
0
मेडिकल चॅटबॉट' प्रकल्पाचा विशेष गौरव

लोणी रुपाली भालेराव राहता तालुक्यातील 
लोणी येथील पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँन्ड इंजीनियरिंग (पॉलिटेक्निक),लोणी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आपल्या तांत्रिक कौशल्याचा वापर करून आरोग्य क्षेत्रात एक नवी दिशा दर्शवली आहे.
महाविद्यालयातील यश भालेराव आणि ओमकार तुपे गौरव दिघे या विद्यार्थ्यांनी 'मेडिकल चॅटबॉट:डिसीज डिटेक्शन अँड सजेशन' नावाचा अत्यंत उपयुक्त आणि आधुनिक प्रकल्प यशस्वीरीत्या पूर्ण केला आहे. या नाविन्यपूर्ण प्रयोगाबद्दल संपूर्ण महाविद्यालय परिसरात या विद्यार्थ्यांचे कौतुक होत असून त्यांच्या या कामगिरीने संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

प्रकल्प प्रमुख यश भालेराव आणि त्यांचे सहकारी ओमकार गौरव यांनी विकसित केलेला हा 'मेडिकल चॅटबॉट' कृत्रिम बुद्धिमत्तेवर (एआय) आधारित आहे.हा चॅटबॉट रुग्णांशी संवाद साधून त्यांच्या लक्षणांची माहिती घेतो आणि त्या आधारावर संभाव्य आजाराचे प्राथमिक निदान करतो.

इतकेच नव्हे तर, आजाराचे स्वरूप लक्षात घेऊन हा चॅटबॉट रुग्णाला प्राथमिक उपचार आणि पुढील वैद्यकीय सल्ला देखील सुचवतो. ग्रामीण भागातील लोकांसाठी, जिथे तज्ज्ञ डॉक्टरांची सेवा त्वरित उपलब्ध होण्यात अडचणी येतात, अशा ठिकाणी हे तंत्रज्ञान अत्यंत प्रभावी आणि मार्गदर्शक ठरणार आहे.

विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय तांत्रिक प्रगतीची दखल घेत महाविद्यालयाचे प्राचार्य श्री राठी यांच्या हस्ते या विद्यार्थी पथकाचा विशेष सत्कार करण्यात आला. प्राचार्य श्री. राठी यांच्या हस्ते यश आणि गौरव यांना सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी बोलताना प्राचार्यांनी विद्यार्थ्यांच्या कल्पकतेची प्रशंसा केली आणि सांगितले की, सामाजिक प्रश्नांवर तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उपाय शोधणे ही काळाची गरज आहे.

विद्यार्थ्यांनी अभ्यासाव्यतिरिक्त अशा प्रकारचे संशोधन करणे ही इतर विद्यार्थ्यांसाठी देखील प्रेरणादायी गोष्ट आहे.या यशाबद्दल महाविद्यालयाचे सर्व विभागप्रमुख,शिक्षक वृंद आणि कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. भविष्यात या प्रकल्पाची व्याप्ती वाढवून तो अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याचा मानस या तरुण तंत्रज्ञांनी व्यक्त केला आहे. लोणी आणि राहाता परिसरातून या विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!