नाशकात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी होते.गर्दीचा उच्चांक असतो परंतु ही गर्दी मतांमध्ये प्रवर्तित होऊन चळवळीतील लोक निवडून येणे दुर्मिळच.का? कोण जाणे चळवळीतील लोकांना मतदान करण्यास लोकं कानकुच करतात.
अशात एक जातीवंत पँथर देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डासारख्या राष्ट्रीय वलय असलेल्या संस्थेचा कार्यकारी प्रमुख( उपाध्यक्ष) होतो हे तेव्हाच्या आम्हा कुमार वयीनसाठी कौतुकास्पद कुतूहल,औत्सुक्य तेवढेच अभिमानाचे होते. वर्तमानपत्रातील तसेच इतर चर्चेत ज्यांचे नाव ऐकत आलो.
त्या दिवंगत विलास पवार यांच्यासोबत ते मागील विधानसभा निवडणुकीतील इच्छुक उमेदवार म्हणून कामानिमित्त संपर्क आला आणि त्यांच्या वरुन कणखर पण आतून तितक्याच प्रेमळ, कोमल,मुलायम स्वभावाचा प्रत्यय आला.प्रत्येकाशी प्रेमाने, अदबीने बोलण्याचा,सर्व जातीधर्माच्या लोकांना सोबत घेऊन चालणारा त्यांचा स्वभाव विलास पवार उपाध्यक्ष पदाचे हकदार असल्याचे दर्शवित असे.
त्याच दिवसांत विलास स्टेशनवरील पार्किंग येथे बसलेले असताना चळवळीवर चर्चा सुरू होती.माझ्या सोबत असणारे एक स्नेही त्यांना पार्किंगचे व्यवस्थापक समजून बोलत होते ( अर्थात मी नंतर सांगितले की ते विलास पवार आहेत तेव्हा ते खजिल झाले)चळवळीबद्दल बोलताना काय काय योगदान दिले, कसा कसा संघर्ष केला हे विलास पवार पोटतिडकीने सांगत होते.
समोरचा व्यवस्थापक समजून उच्च स्वरात चर्चा करीत होता तरीही विलासराव त्याच अदबीने बोलत होते.चिडचिड नाही,आक्रस्ताळेपणा नाही, हेच त्यांच्या व्यक्तिमत्वाचे वैशिष्ट आणि त्यांच्या विचारांची उंची होती.त्यांच्यातला तोच जातीवंत पँथर त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता.
त्यामुळेच डॉ.आंबेडकरवाडी येथे खून झालेल्या जाधव बंधूंना न्याय मिळावा यासाठी झालेल्या सर्व बैठका तसेच मोर्चात विलासराव हिरीरीने सहभागी होऊन मार्गदर्शन करीत होते. त्या मोर्चात उन्हामुळे आलेली भोवळ त्यांची तबियत अलबेल नसल्याचे संकेत देऊन गेली होती मात्र एवढ्या लवकर विलासराव सोडून जातील असे वाटले नव्हते.
कारण आम्ही सोबत असताना एकदा त्यांचे एक मित्र बोलले होते की "मस्त तबीयत केली तुम्ही ." विलासराव बोलले की "एकदम फिट आणि टकाटक!"
उत्तम आरोग्यासाठी ते करीत असलेल्या आणि इतरांनाही त्याबद्दल मार्गदर्शन करीत असलेल्या कोर्समुळे हे शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले .
विलासराव सोबत फोरचुनर गाडीत प्रवास करताना गाडीसारखेच हे व्यक्तिमत्व देखील ब्रँडेड असल्याचे जाणवले.अशा या ब्रँडेड व्यक्तिमत्वास मानाचा,आदराचा,क्रांतिकारी, अखेरचा ब्रँडेड जयभीम.
देवळाली कॅम्प परिसराच्या विकासासाठी तसेच समाजाच्या उन्नतीसाठी असलेले तुमचे योगदान आणि तुमचे ब्रँडेड व्यक्तिमत्व कायम स्मरणात राहील!
मिस यु विलास भाऊ पवार!
राहुल खळेकर
