संगमनेरच्या रावी हांडेची न्याय क्षेत्रातील संशोधनासाठी हॉंग कॉंग मधील विद्यापीठात निवड

Cityline Media
0
संगमनेर प्नतिनिधी संगमनेर महाविद्यालयातील मराठीचे प्राध्यापक डॉ.प्रा.राहुल हांडे यांची कन्या रावी हांडे युनायटेड किंग्डम मधील जगप्रसिद्ध मँचेस्टर युनिव्हर्सिटी येथे कायद्याच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेत आहे.तिच्या अभ्यासातील उल्लेखनीय कामगिरीमुळे तिची निवड प्रतिष्ठित चायनीज युनिव्हर्सिटी ऑफ हाँग काँग येथील समर अंडरग्रॅज्युएट रिसर्च प्रोग्रॅम २०२६ साठी झाली आहे.
जगभरातील नामांकित विद्यापीठांमधून कायद्याचे असंख्य हुशार विद्यार्थी या कार्यक्रमासाठी अर्ज करतात, परंतु केवळ १० विद्यार्थ्यांचीच निवड केली जाते.या अत्यंत स्पर्धात्मक प्रक्रियेत रावीने आपले स्थान निश्चित केले हे वाखाणण्याजोगे आणि विशेष अभिमानास्पद आहे.या उपक्रमा अंतर्गत इंडिपेंडेंट रिसर्च ऑन इंटरनॅशनल स्टडीज हा अभ्यासक्रम ती २१ जून ते १५ ऑगस्ट २०२६ या कालावधीत पूर्ण करणार आहे.प्रोफेसर ब्रायन हावर्ड डूझीन यांच्या मार्गदर्शनाखाली द फ्युचर ऑफ इंटरनॅशनल लॉ हा तिचा संशोधन विषय असणार आहे.

रावीची संशोधन क्षमता आणि गुणवत्ता ओळखून चायनीज युनिव्हर्सिटी ऑफ हाँग काँगने तिला ८ हजार १५० हाँग काँग डॉलर्सची शिष्यवृत्ती प्रदान केली आहे.आंतरराष्ट्रीय पातळीवर मिळवलेल्या या यशाबद्दल रावी हांडे हिचे सर्वत्र कौतुक होत आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!