नाशिक दिनकर गायकवाड शहर परिसरात विनयभंगाचे प्रकार वाढले असून,वेगवेगळ्या दोन ठिकाणी विविध कारणांतून महिलांचे विनयभंग करण्यात आल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
छाया रेखांकन-प्रकाश कदम
विनयभंगाचा पहिला प्रकार नानावली येथे घडला. फिर्यादी या लहान मुलासह भाजीपाला घेण्यासाठी नानावली येथे गेल्या होत्या. त्यावेळी आरोपी मोबिन (पूर्ण नाव पत्ता माहीत नाही) हा महिलेच्या पाठीमागून आला, तसेच तिच्याशी बळजबरीने बोलण्याचा प्रयत्न केला,तसेच तूने मेरे साथ बात नही, की तो तुम्हारे उपर ॲसिड फेकूँगा, असे म्हणून तिच्या पाठीवरून हात फिरविला, तसेच फिर्यादीच्या मनास लज्जा उत्पन्न होईल,असे कृत्य करून तिचा विनयभंग केला. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात मोबीन विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शेख करीत आहे.
