नाशिक दिनकर गायकवाड पंचवटी परिसरात दुसऱ्या टप्प्यात सुमारे २ हजार वृक्षांची लागवड करून ७ एकर क्षेत्र हिरवळीत नटले असून, या उपक्रमाची पाहणी कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी केली. वृक्षांचे १०० टक्के संगोपन होत असल्याचा दावा यावेळी करण्यात आला.
छाया रेखांकन-अजित अशोक ब्राम्हणे
या मोहिमेसाठी एन.आय.टी.महाविद्यालयाने पुढाकार घेत नाशिक महानगरपालिकेच्या जागेची स्वच्छता करून वृक्ष लागवडीसाठी तयारी केली. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनीही उत्साहाने सहभागी होत वृक्ष संवर्धनाचा संकल्प केला.

यावेळी महापौर हिमगौरी आहेर-आडके,जिल्हाधिकारी आयुष प्रसाद,महापालिका आयुक्त मनीषा खत्री तसेच अन्य पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान, मंत्री महाजन यांनी म्हसरूळ येथील प्राचीन सीताकुंड येथेही भेट देऊन पाहणी केली.याठिकाणी स्वच्छता,दुरुस्ती व आवश्यक बांधकाम करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले.