स्वच्छतेबाबत समितीकडून समाधान व्यक्त
लोणी रुपाली भालेराव हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियानांतर्गत नुकतेच राहाता तालुक्यातील लोणी बसस्थानक येथे चौथे सर्वेक्षण उत्साहात पार पडले.
या अभियानाद्वारे राज्यातील बसस्थानकांचा कायापालट करण्याचा मानस असून,त्या पार्श्वभूमीवर लोणी येथे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या समितीने प्रत्यक्ष भेट देऊन विविध बाबींची पाहणी केली. या सर्वेक्षणासाठी नाशिक विभागाचे विभाग नियंत्रक श्री.क्षीरसागर, यंत्र अभियंता श्री.शेळके आणि आगार व्यवस्थापक प्रशांत गुंड हे प्रामुख्याने उपस्थित होते.
तसेच लोणी बसस्थानकाचे वाहतूक नियंत्रक रावसाहेब पर्वत आणि नंदकिशोर कानकाटे यांनी समितीला बसस्थानकातील व्यवस्थेची सविस्तर माहिती दिली.सर्वेक्षण दरम्यान समितीच्या सदस्यांनी बसस्थानकाचा परिसर, स्वच्छता गृहे,प्रवासी सुविधा आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था यांची बारकाईने पाहणी केली.
लोणी बसस्थानकावरील टापटीप आणि स्वच्छता पाहून समितीने विशेष समाधान व्यक्त केले.याप्रसंगी लोणी बसस्थानक प्रशासन आणि लोणी ग्रामपंचायतीच्या वतीने उपस्थित सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
हे अभियान यशस्वी करण्यासाठी आणि लोणी परिसराच्या विकासासाठी मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील,जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील आणि भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांचे नेहमीच मोलाचे मार्गदर्शन लाभत असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.
या कार्यक्रमाला लोणी गावातील ग्रामस्थ आणि लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.यामध्ये किसन विखे ,रंगनाथ बाळाजी विखे,अनिल विखे,राहुल धावणे,विजय लगड, भाऊसाहेब विखे यांचा प्रामुख्याने समावेश होता.तसेच लोणीच्या सरपंच कल्पना मैड, उपसरपंच गणेश विखे ,खंडू धावणे,राजेंद्र मते, दिलीप जगन्नाथ विखे , एन.डी.विखे,सोपान विखे पाटील, बद्रीनाथ विखे, ग्रामपंचायत ग्रामसेविका, मा.सरपंच भाऊसाहेब बनसोडे,गणेश मधुकर विखे, जालिंदर विखे आणि किशोर धावणे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.बसस्थानकाच्या या उपक्रमाfमुळे प्रवाशांमध्ये समाधानाचे वातावरण असून,स्वच्छतेचा हा दर्जा कायम राखण्याचा निर्धार ग्रामस्थांनी व कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
