ठाणे मनपा उपविभागीय अधिकारी उमेश बिरारी यांचे निलंबन

Cityline Media
0

भूसंपादनात अनियमितता की संगनमत? शासनाची कठोर कारवाई

ठाणे विशाल सावंत मुंबई पश्चिम उपनगरातील बोरीवली येथील भूसंपादन प्रकरणात गंभीर अनियमितता केल्याप्रकरणी तत्कालीन उपविभागीय अधिकारी उमेश बिरारी यांना शासनाने तात्काळ प्रभावाने निलंबित केले आहे.
            उपविभागीय अधिकारी उमेश बिरारी 
जमिनीच्या दराऐवजी सदनिकांच्या विक्री व्यवहारांवरून मोबदला निश्चित करणे, भारग्रस्त जमिनीसाठी वजावट न करणे तसेच मूळ मालकांना डावलून सुमारे ६०.३० कोटी रुपयांचा मोबदला थेट विकासकाला वितरित केल्याचे आरोप आहेत.

या प्रकरणी महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियमांनुसार विभागीय चौकशी सुरू असून, नियमभंग केल्याचे प्राथमिक निष्कर्ष समोर आले आहेत. निलंबन काळात त्यांचे मुख्यालय जिल्हाधिकारी, ठाणे येथे राहणार असून, पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडण्यास मनाई करण्यात आली आहे.

दरम्यान, निलंबन काळात त्यांना नियमानुसार निर्वाह भत्ता देण्यात येणार असून, कोणतीही खाजगी नोकरी किंवा व्यवसाय न करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!