सिटीलिंकच्या वतीने नाशिकरोड ‌ते मखमलाबाद मार्गे जेलरोड मार्गावर बससेवा सुरू

Cityline Media
0
नाशिक संतोष रखमे नाशिक महानगर परिवहन महामंडळ लि. (सिटीलिंक)च्या वतीने प्रवाशांच्या सोयीकरिता नवीन ३ मार्ग  सुरु करण्यात आली असून या मार्गावरील प्रवाश्यांची होणारी गैरसोय लक्षात घेता हे नवीन मार्ग सुरु करण्यात येत आहे. जास्तीत जास्त प्रवाशांनी या प्रवासाचा लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी करण्यात आले.
सविस्तर तपशील पुढीलप्रमाणे–१) मार्ग क्रमांक ११४ ( नाशिकरोड ते मखमलाबाद मार्गे जेलरोड, नारायण बापू नगर, निलीगिरी बाग, हनुमान नगर, आर टी ओ कॉर्नर, म्हसरूळ) या मार्गावर एकूण ३० बसफेऱ्या सुरु करण्यात येत असून दर अर्धा तासाला बस उपलब्ध असणार आहे. सदर बसेफेर्यांच्या वेळा पुढीलप्रमाणे-
वेळा - तपोवन ते मखमलाबाद – ०६:५०, ०७:२०, ०७:५०, ०८:२०, ०८:५० वाजता
मखमलाबाद ते नाशिकरोड – ०७:३०, ०८:००, ०८:३०, ०९:००, ०९:३०, १०:१५, ११:१५, १२:१५, १३:१५, १४:१५, १५:१५, १६:१५, १७:१५,१८:१५, १८:४५ वाजता
नाशिकरोड ते मखमलाबाद – ०८:५०, ०९:२०, ०९:५०, १०:२०, १०:५०, १३:००, १४:००, १५:००, १६:००, १७:०० वाजता

वरील  मार्गावरील बससेवा सोमवार दि. २७/०४/२०२६ रोजीपासून सुरु होत असून जास्तीत जास्त प्रवाश्यांनी सदर बससेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन सिटीलिंक प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!