नव दाम्पत्यांनी स्वतःच्या घराची निर्मिती करावी-ॲड.आकाश दळवी

Cityline Media
0
पिंपरी चिंचवड प्नतिनिधी अनेक पालकांची अपेक्षा असते कि मुलाचे स्वतःचे घर असावे ह्या विचारांना फाटा देऊन ॲड. आकाश दळवी यांनी आपले विचार व्यक्त करताना सांगितले कि तरुणांनीच विवाहानंतर स्वतःच्या घाराची निर्मिती करावी की ज्यामुळे पतीपत्नीचे नाते घट्ट होण्यास मदत होईल.
पुण्यातील चिंचवडच्या सेंट फ्रांसिस चर्च मध्ये स्व. दादाभाऊ भोसले प्रतिष्ठाच्या वतीने १७२ व्या ख्रिस्ती वधू-वर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.या सेवाभावी उपक्रमाचे उदघाट्न बेथानी प्रेयर हौस फौंडेशनचे संचालक सुधीरकुमार कांबळे यांच्या हस्ते झाले.

मार्गदर्शन करताना सुधीरकुमार म्हणाले कि,ख्रिस्ती कुटुंबाचे वास्तव हे विश्वास,आशा आणि प्रीती यावर आधारित असून कौटुंबिक ऐक्यासाठी प्रीती अतिशय महत्वाची आहे. बिषप थॉमस आयर्वीन याप्रसंगी म्हणाले कि, विवाहासाठी निवड झाल्यानंतर अंतिम निर्णय घेण्यासाठी आई वडिलांची भूमिका अतिशय महत्वाची असते.

एल.जी.इंडिया कंपनीचे एच आर जनरल व्यवस्थापक सुनील काळे यांनी विचार व्यक्त करताना सांगितले कि, विवाहासाठी पसंती करताना शिक्षणाबरोबरच संस्काराला व अंतरगुनांना अधिक महत्व द्यावे.
या समाजमान्य उपक्रमात पुण्यासह नाशिक, सम्भाजीनगर, अमरावती, मुंबई, ठाणे,अहिल्यागर कोल्हापूर इत्यादी जिल्ह्यातून आलेल्यांची उपस्थिती १७० हुन अधिक दिसून आली.

सुरुवातीला प्रास्ताविक आवारे यांनी केले तर सूत्रसंचालन संयोजक श्रीधर भोसले यांनी केले. 
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अश्विन थोरात,प्रेमानंद गायकवाड,स्यामुएल जाधव नियल सकपाळ,राजू चांदणशीव,डॉमिनिक कदम आदिनी परिश्रम घेतले.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!