राहुरी रोहयोतील कामबंद आंदोलनाचा फटका;मजुरांवर उपासमारीची वेळ

Cityline Media
0
घरकुल,विहीर,पशुपालनाशी संबंधित कामे ठप्प

राहुरी कमलेश विधाटे-महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत कार्यरत रोजगार सहाय्यकांनी १ एप्रिलपासून सुरू केलेल्या कामबंद आंदोलनाचा थेट परिणाम रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुरांवर होत असून अनेकांना उपासमारीची वेळ आली आहे.
शासनाला निवेदन देऊन १ तारखेपासून काम बंद केले आहे आज जवळ जवळ १२ दिवस झाले आहे तरी सरकार या बंदकडे दुर्लक्ष करित आहे सरकारला ही कामेच बंद करायाचे की काय असा प्रश्न ग्रामस्थ उपस्थित करित आहे इतर राज्यात सुरु आहे.

महाराष्ट्र सरकार या कामांकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष करित आहे परंतु त्यावर सरकार निर्णय घेण्यासाठी शासनाने अधिसूचना लागू करण्यासाठी असफल झाल्यामुळे रोजगार सहाय्यकांनी आंदोलन उभे केले आहे त्याचा परिणाम गाव पातळीवर रोजंदारी करणाऱ्या ग्रामस्थांवर चालू झाला आहे .ग्रामपातळीवर सुरू असलेली विविध कामे सध्या पूर्णपणे ठप्प झाली आहेत.

यामध्ये घरकुल बांधकाम, विहीर खोदकाम,गाय-गोठा, शेळीपालन शेड,कुकुटपालन शेड ,बांधावर वृक्ष लागवड ,रस्त्याच्या कडेने वृक्ष लागवड ,संडास बांधणे ,वन विभागतील वृक्ष तयार करणे असे  अनेक कामांचा समावेश आहे. या सर्व कामांसाठी आवश्यक असलेले (मस्टर )मजुरी बंद झाल्यामुळे मजुरांना मिळणारी रोजंदारी अचानक थांबली आहे.

दररोजच्या कमाईवर उदरनिर्वाह करणाऱ्या कुटुंबांसमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. काम बंद असल्यामुळे अनेक मजुरांना पर्यायी रोजगाराच्या शोधात इतर ठिकाणी जावे लागत आहे. काही ठिकाणी तर कुटुंबाच्या गरजा भागवण्यासाठी कर्ज घेण्याची वेळही आली आहे.

दरम्यान, संबंधित प्रशासनाने लवकरात लवकर यावर तोडगा काढून बंद पडलेली कामे सुरू करावीत, शासनाने रोजगार सहाय्यकासाठी काढलेलेली अधिसूचना व इतर मागण्या मान्य करून काम चालू करण्यात यावे त्यांना न्याय द्यायचा नव्हता तर अधिसूचना कोणत्या कारणासाठी काढली आहे हे फक्त दाखवण्यासाठी आहे की काय असे प्रश्न ग्रामस्थांमध्ये निर्माण झाले आहे यासाठी दिलेला अशी मागणी मजुरांकडून होत आहे.अन्यथा ग्रामीण भागातील गरीब कुटुंबांचे तारांबळ अधिकच वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!