गुजरात राष्ट्रीय विधी विश्वविद्यालय येथे सुवर्ण पदक प्रदान
चणेगाव प्रतिनिधी राहुरी तालुक्यातील सात्रळ येथील पुंजाजी सहादु कडु पाटील महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी आणि संगमनेर तालुक्यातील चणेगाव येथील विधिज्ञ गोविंदा श्रीकांत आसावा यांस गुजरात राष्ट्रीय विधी विश्वविद्यालय, गांधीनगर येथील पदवीदान समारंभात पाच सुवर्णपदकाने भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सुर्यकांत यांच्या हस्ते गौरविण्यात आले होते.
गोविंदाच्या गौरवपूर्ण कार्याबद्दल रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अरुण कडु यांच्या हस्ते व कृषीभूषण डॉ.विठ्ठलदास आसावा,अभियंता पुरुषोत्तम आसावा,ऊद्योजक मोतीलाल मुंदडा,सामाजिक कार्यकर्ते किरण कडु,प्राचार्य गारुडकर,प्रा.रामदास तांबे यांच्या प्रमुख उपस्थितीत सन्मानित करण्यात आले.
गोविंदा आसावा याने सर्वोच्च स्थानावर राहुन पाच वर्षांच्या अभ्यासक्रमातील सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल स्व.ए.पी.गांगुली आदर्श विद्यार्थी सुवर्ण पदक,फौजदारी कायदा विषयात प्राविण्य मिळविल्याबद्दल स्व.न्यायमुर्ती व्ही.बी.राजू सुवर्णपदक,कायदा आणि अर्थशास्त्र विषयातील यशाबद्दल जस्टीस डॉ.ए.के.सिक्री सुवर्ण पदक, वाणिज्य कायदा विषयासाठी युनियन बँक सुवर्णपदक,घटनात्मक न्यायव्यवस्था विषयातील विशेष नैपुण्याबद्दल स्व.शरद बी.वकील सुवर्ण पदक याप्रमाणे पाच पदके पटकाविली आहेत.यावेळी महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी,विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
