संगमनेर प्रतिनिधी तालुक्यातील कोकणगावच्या अंधेरी वस्ती येथील पार्वताबाई मनोहर पवार (वय ८२) यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांच्या पश्चात पती मुलगा दोन मुली सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे.येथील जुन्या पिढीतील आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीतील कार्यकर्ते मनोहर पुंजा पवार यांच्या त्या पत्नी होत तर विलास मनोहर पवार यांच्या मातोश्री होत नवी मुंबईचे माजी महापौर सुधाकर संभाजी सोनवणे यांच्या त्या भगिनी होत त्यांच्या अचानक निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे
