पवननगर ते निमाणी रिक्षा प्रवासात चालकाने वृद्ध महिलेचे ‌दागिने चोरले

Cityline Media
0
नाशिक दिनकर गायकवाड शहरातील पवननगर ते निमाणी रिक्षा प्रवास दरम्यान एका रिक्षाचालकाने वृद्ध महिलेकडील ६३ प्रकार हजार रुपये किमतीचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली.
घडलेल्या घटनेबाबत माहिती अशी की फिर्यादी गोकुळाबाई युवराज गुजर (रा. साई रेसिडेन्सी, कडवेनगर, पाथर्डी फाटा) या सिडकोतील पवननगर बस स्टॉप ते निमाणी बस स्टॅण्ड यादरम्यान रिक्षाने प्रवास करीत होत्या. त्यादरम्यान अज्ञात रिक्षाचालकाने महिलेने बॅगमध्ये ५० हजार रुपये किमतीच्या १० ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या वाट्या असलेले मंगळसूत्र, १० हजार रुपये किमतीची १० ग्रॅम वजनाची सोन्याची नथ व तीन हजार रुपये किमतीचे चांदीचे जोडवे असे ६३ हजार रुपये किमतीचे दागिने फिर्यादीच्या संमतीशिवाय चोरून नेले. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात अज्ञात रिक्षा चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!