श्रीरामपूर दिपक कदम शहरातील डी पॉल पब्लिक स्कूलचा सीबीएसई इयत्ता दहावीचा निकाल यंदा शेकडा १०० टक्के लागला असून शाळेच्या यशात विद्यार्थ्यांनी उज्ज्वल कामगिरी नोंदवली आहे. या निकालात अनुष्का राजेंद्र बोर्डे हिने ९७ टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला.
वैष्णवी थोरात हिने ९६ टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक मिळवला, तर आर्या बस्ते हिने ९३.६० टक्के गुणांसह तृतीय क्रमांक मिळवला. विशेष म्हणजे, तृतीय क्रमांकावर दोन विद्यार्थ्यांनी स्थान मिळवले आहे. यंदा शाळेतील बारा विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
या यशामागे शाळेचे प्राचार्य फा.शिजो,व्यवस्थापक फा. फ्रैंको, उपप्राचार्य सिस्टर पावना तसेच शिक्षकवृंद-रविंद्र लोंढे, बाळासाहेब मते, आशिष अमोलिंक,अशोक पवार, शबाना पठाण आणि इतर सर्व शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून त्यांचे कौतुक करण्यात येत आहे.
