संगमनेर जिल्हा सत्र न्यायालय वकील संघाच्या उपाध्यक्षपदी ॲड किरण रोहम यांची बिनविरोध निवड

Cityline Media
0
संगमनेर प्रतिनिधी तालुक्यातील पिंपारणे येथील मा.आमदार दादासाहेब तथा पी.जे रोहम यांचे नातू व आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ नेते सुधाकर रोहम यांचे चिरंजीव पी.जे.रोहम फाउंडेशनचे अध्यक्ष व संगमनेर जिल्हा सत्र न्यायालयातील विधितज्ञ ॲड.किरण सुधाकर रोहम यांची संगमनेर वकील संघाच्या उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली.
ॲड रोहम हे फुले शाहू आंबेडकर चळवळीचे उभारते युवा नेतृत्व आहे संपूर्ण आहिल्यानगर जिल्ह्यात कार्यकर्त्यांचा मोठा संच असलेला एक युवा नेता म्हणून त्यांचे नाव आहे समाजातील तळागाळातील शोषित वंचित आणि दुर्लक्षित व्यक्तींच्या समस्या सोडवण्यासाठी ते नेहमी कटिबद्ध असतात.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या सानिध्यात राहिलेले व बाबासाहेबांचे निष्ठावंत कार्यकर्ते ज्यांनी अनेक सत्याग्रहात डॉ. बाबासाहेबांबरोबर भाग घेतला असे पी जे रोहम यांचे कार्य लक्षात घेऊन समाज संघटन करण्याचे तंत्र त्यांच्यामध्ये आहे आज संगमनेर तालुक्यात सर्वसामान्य जनतेचा एक विश्वास व आधार म्हणून ॲड. किरण रोहम यांच्याकडे पाहिले जाते.

 त्यांच्या निवडीमुळे जनसामान्यांच्या मनात आदराची भावना निर्माण झाली आहे संगमनेरच्या इतिहासामध्ये प्रथमच बहुजन समाजातील एक सामाजिक चळवळीतील नेतृत्वाला वकील संघाचे उपाध्यक्ष पद भूषवण्याची संधी मिळवली आहे यामुळे तालुक्यात प्रचंड आनंदाचे वातावरण आहे.

ॲड किरण रोहम यांच्या निवडीबद्दल विविध मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत जागोजागी त्यांचा भीम उत्सवानिमित्त निवड झाल्यानिमित्त सत्कार होत आहे या  नेतृत्वाचे अबाल वृद्धांपासून तरुणांपर्यंत मनापासून स्वागत होत आहे तालुक्यात आपला माणूस आपल्यासाठी उभा राहील अशी भावना होत आहे.

आपल्या निवडीबद्दल ॲड.किरण रोहम  म्हणतात की मी जनसामान्यांच्या हितासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या रक्षणासाठी प्रयत्नशील राहील समाजातील दीन दुबळ्या घटकांसाठी मी नेहमीच कृतीशील  राहिल माझ्या कुटुंबाला चळवळीचा वारसा आहे व माझे वडील सुधाकर रोहम यांनी अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये फुले शाहू आंबेडकर चळवळ जिवंत ठेवण्याचे काम केलं आहे याचीच पोचपावती म्हणून समाजाप्रती मी आदर व्यक्त करतो कारण रोहम परिवार हा सर्वसामाजिक स्तरावर शांतता प्रस्थापित करण्यासाठी संगमनेर तालुक्यातील एक महत्त्वाचा घटक मानला जातो असे ते म्हणाले त्यांच्या निवडीबद्दल विविध मान्यवरांनी संस्थांनी त्यांच्या पुढील कार्यासाठी त्यांना भरभरून शुभेच्छा दिल्या.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!