१ मे ला आनंदवाडी येथे वाढदिवस उत्साहात साजरा
संगमनेर तालुक्यातील आनंदवाडी, चंदनापुरी गावातील एक सामान्य कुटुंबात जन्माला आलेले आई-वडिलांचे अत्यंत गरिबीची परिस्थिती त्यामुळे अत्यल्प शिक्षणात आपला उदरनिर्वाह करण्याच्या उद्देशाने आयटीआयचे शिक्षण घेऊन संगमनेर कॉलेजमध्ये एमसीवीसी अभ्यासक्रम शिकून मिळणाऱ्या तुटपुंज्या मानधनात आपले गुजराण करणारे सुखदेव भालेराव, बंधू अशोक भालेराव यांच्या सानिध्यात राहून कधीही कौटुंबिक वाद होऊ न देणारे सुखदेव भालेराव समाजात एक प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून आपली छबी निर्माण करतात.
आयु.सुकदेव भालेराव
त्यांचा मंगल परिणय वाघमारे परिवारातील हेमलता यांच्या बरोबर होतो परंतु नित्यनियमाने शरीरात प्राण असेपर्यंत कार्यकर्ता राहील ही अपेक्षा असणारे हाडामासाचा आंबेडकरी चळवळीचा एक निष्कलंक कार्यकर्ता १९९३ पासून २०२५ पर्यंत सतत समाज कार्य करण्यासाठी धडपडणारा फुले शाहू आंबेडकर चळवळीचा सच्चा पाईक.
वाहतूक व दळणवळणाची व्यवस्था नसताना बसने संगमनेरला येऊन चळवळीला योगदान देण्यासाठी अनेक वेळा घरची शिदोरी बांधून सतत धावपळ करणारा एक निष्ठावंत कार्यकर्ता पण आयुष्याच्या शेवटपर्यंत मी फक्त माझ्या तत्त्वालाच जपणार आहे जगणार तर निळ्या झेंड्यात आणि मरणार सुद्धा निळा झेंड्यात हा निश्चय करून गावात शहरात समाजातील तळागाळाचे काम करण्यासाठी विविध चळवळीत भाग घेणारा हा अवलिया.
अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील डॉ बाबासाहेब आंबेडकर नावाची पतसंस्था टिकावी यासाठी प्रयत्न करणारा आहे एक कुशल सेवक बाबासाहेबांची चळवळ गतिमान करता करता बाबासाहेबांचे नाव टिकविणे किती महत्त्वाचे आहे हे समजून सांगणारा एक समाजसेवक समाज कार्यात रस असणारा हा एक कार्यकर्ता.
दरम्यानच्या काळात मा.आमदार पी जे रोहम यांचे चिरंजीव मा. सनदी अधिकारी सुधाकर रोहम यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन चळवळीसाठी वाहून घेतलं या चळवळीत सुधाकर रोहम यांच्या समवेत सावली प्रमाणे राहणारा रोहमांचा एक सच्चा सेवक सुखदेव भालेराव.
श्री.रोहम यांच्या हप्रत्येक बैठकीत गावांच्या दौऱ्याला गेल्या ३० वर्षापासून सतत नियोजन करणारा हा एक चळवळीतील कार्यकर्ता रोहम साहेबांबद्दल अत्यंत प्रेम असलेला सुखदेव भालेराव एक सेवाभावी समर्पित वृत्ती म्हणावी लागेल सुधाकर रोहम रागविले तरी सुद्धा राग न मांडणारा त्यांची भेट न झाल्यास आतुरतेने त्यांना भ्रमणध्वनी करणारा अवलिया.
कधी सुधाकर रोहम यांचा राग आल्यास त्यांना स्पष्टपणे हे मला पटत नाही असा ठाम सांगणारा सुखदेव भालेराव एक असं रसायन आहे की त्याच्यामध्ये निळ्या रक्ताची एक धार निर्माण झाली आहे ज्यामुळे अत्यंत कमी पगारामध्ये दोन हजार रुपयांमध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर पतसंस्थेचे ते काम करत होते.
याला कारणही असेच आहे की डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाची ही संस्था आहे या संस्थेत मी आहे म्हणून आपल्या समाजातील लोकांना विचार मांडण्यासाठी ठिकाण राहील व येणाऱ्या जाणाऱ्या माणसांची समस्या सोडवण्यासाठी संपर्क कार्यालय यासाठी सतत नवनवीन संचालक जोडणारा सुखदेव भालेराव हा एक महान सूत्रसंचालकच म्हणावा लागेल.
चळवळीच्या काळामध्ये अनेक गोरगरीब जनतेच्या शिधापत्रिका जातीचे दाखले उत्पन्नाचे दाखले अत्यंत कमी खर्चामध्ये काढून देऊन त्या लोकांमध्ये आनंदमय वातावरण निर्माण करून देणारे सुखदेव भालेराव होय विधवा त्यांना संजय गांधी निराधार राजीव गांधी घरकुल योजना मिळवून देण्यासाठी तहसील कार्यालय प्रांत कार्यालय तलाठी कार्यालय यांच्याशी दुवा साधणारा हा मास्तर होय
गावामध्ये चंदनापुरी गावात मास्तर म्हणजे एक वलय असलेलं नेतृत्व होय चंदनापुरीतील अनेक नेतृत्वाने मास्तर म्हणजे काय हे अनुभवलेले आहे आणि मास्तरच्या शब्दाला वजनही त्या ठिकाणी होत मास्तरच्या स्वभावामुळे मास्तर हा तलाठी कार्यालयात येणाऱ्या नागरिकांचे छोटे-मोठे काम करून देण्यासाठी माहीर असायचा.
सुधाकर रोहम यांच्या बरोबर काम करताना अनेक युवक कार्यकर्त्यांना जोडून चळवळ संघटना मजबूत करण्यासाठी सुखदेव भालेराव यांचे योगदान महत्त्वाचे आहे गावोगावी जाऊन महिला बचत गट असतील विविध शाखा प्रारंभासाठी प्रथम सुखदेव भालेराव जायचे आणि त्यानंतर सुधाकर रोहम दुसरा दौरा करायचे माणसांची सभा व इतर गोष्टी व कार्यालयीन माहिती सर्वकाही सुखदेव भालेराव सांभाळत असत.
अर्थातच सुधाकर रोहम यांचं कार्यालय म्हणजे चालतं बोलतं नेतृत्व सुखदेव भालेराव यांच्याकडे पिशवीमध्ये सुधाकर रोहम यांचे शिक्के लेटर पॅड व विविध नियुक्तीपत्र यांचा खजिनाच त्या ठिकाणी सापडायचा दरम्यानच्या काळात सुखदेव भालेराव यांना विशेष कार्यकारी अधिकारी पदही उपभोक्ता आलं पण या पदाचा त्यांनी कधीही गैरफायदा घेतला नाही.
गोरगरिबांना त्यांचे झेरॉक्स सत्यप्रत करून देण्यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असायची सुखदेव भालेराव यांचं राजकीय वजनही त्या प्रमाणात महत्त्वाचा आहे संगमनेर तालुक्याचे भाग्यविधाते लोकनेते मा.मंत्री बाळासाहेब थोरात यांचे मास्तर वर खूप प्रेम आहे.
चंदनापुरी गावामध्ये त्यांचा दौरा असेल त्यावेळेस मास्तरला विचारल्याशिवाय लोकनेते व्यासपीठावरती येत नसत म्हणजे मास्तर एक सर्वांगीण व्यक्तिमत्व होतं की ज्यामुळे सामाजिक एकोपा साधला जायचा सुखदेव भालेराव हे एक प्रामाणिक कार्यकर्ते होते की जे कोणत्याही वाईट गोष्टीवर कधीही चर्चा किंवा गालबोट लागणार नाही याची काळजी घेत असायची.
काही दिवसापूर्वी मा. आमदार पी.जे रोहम यांचे नातू विधीतज्ञ ॲड. किरण रोहम यांच्या सानिध्ध्यात आले व त्यांनी ॲड.किरण रोहम यांच्याबरोबर काम करण्याचे ठरवले व ते कार्यरत राहिले अनेक ठिकाणी किरण रोहम पक्षीय व राजकीय कार्यकर्ते जोडण्याचं काम अत्यंत तळमळीने करत होते.
त्यांच्या श्वासात एकच शब्द असायचा फक्त निळा रंग आणि निळे शाल यासाठी मी माझा आयुष्य पणाला लागेल डिसेंबर २०२४ मध्ये सुखदेव भालेराव यांना सकाळीच थंडीच्या कडाक्यामुळे अर्धांग वायूचा झटका आला व त्यामुळे त्यांना चालण्यास व बोलण्याचा आणि हाताने कार्य करण्यास खूप त्रास होत होता परंतु चळवळीचा कार्यकर्ता म्हटल्यावरती फक्त माणसं जोडत असणार पैसे मात्र जोडण्याचं सुखदेव भालेराव विसरले.
आपल्याच आजारपणा त्यांना दुसऱ्या वरती विसंबून राहावं लागलं परंतु अशा परिस्थितीत समाजातील काही समजदार लोकांनी मदतीचा हात पुढे केला काही प्रमाणात मदत केली असेल तरीसुद्धा कुटुंबाने मात्र त्यांच्यासाठी खूप मोठ्या खस्ता खाल्ल्या छोटीशी मुलगी काजल दादा आणि भोऱ्या यांनी खूप मेहनत करून त्यांचा दवाखान्याचा खर्च भागवण्यासाठी प्रयत्न केले.
हे करत असताना यांच्या तब्येतीत सुधारणा होण्यासाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली ती त्यांच्या पत्नी सौ.हेमलाता भालेराव यांनी त्यांच्यासाठी खूप कष्ट करून भालेराव साहेबांना आहे त्या परिस्थितीत आज उभं राहण्यासाठी सज्ज केला आहे २०२५ मध्ये सुकदेव भालेराव एका जागेवरच बसून असायचे.
आज मात्र त्यांच्या वाढदिवस असताना ते घरभर फिरताना आम्हाला दिसले व आग्रह करत राहिले की तुम्ही जेवून जा आपल्या पत्नीला सांगत होते की यांच्यासाठी जेवण बनव तुम्ही सर्व या फोटो काढ आणि केक कापा अशा पद्धतीने हा एका महान आवलिया आहे की शून्यातून भरारी घेण्यासाठी फिनिक्स पक्षी होण्यासाठी या कुटुंबाने खूप मोठा त्याग केलेला आहे सुकदेव भालेरावांना आजच्या वाढदिवसानिमित्त मंगलमय शुभेच्छा
ॲड.किरण सुधाकर रोहम व मित्रपरिवार आणि मा.आमदार पी.जे.रोहम फाउंडेशन संगमनेर अहिल्यानगर
