येवला महेंद्र पगारे स्वाभिमानी जंयती उत्सव समितीच्या वतीने बुध्द पौर्णिमेनिमित्त येवला मुक्तीभुमीवर तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्तीचे सुगंधी अगरबत्ती मेणबत्ती प्रज्वलित करून पुष्प वाहून सामुहिक त्रिशरण पंचशिल व बुद्ध पुजा पाठ भिमस्तुती घेण्यात आली.
उपस्थित अनुयायांना समितीचे मार्गदर्शक महेंद्र पगारे,ज्योती पगारे याच्या हस्ते खिरदान व बुद्ध पूजापाठाचे पुस्तके मोफत भेट म्हणून देण्यात आले
यावेळी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र पगारे बार्टीच्या मुक्तीभुमी व्यवस्थापक सौ.रेखा बोर्डे अधिकारी श्री.नांदेडकर तालुकाध्यक्ष विजय घोडेराव
ता.कार्याध्यक्ष बाळासाहेब अहिरे ता.उपाध्यक्ष विनोद त्रिभुवन दादासाहेब मोरे. राजेंद्र आहेर.जेष्ठ नेते वसंत घोडेराव जेष्ठ नेते भीमराव खळे जेष्ठ नेते गौतम पगारे तसेच सामाजिक कार्यकर्त्या सौ.ज्योती पगारे कु. करुणा अहिरे. सौ.उषा पगारे सौ.सविता अहिरे आयु.शकुंतला बनसोडे कु.सुजाता पगारे. याच्यासह अनेक बौध्द बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
