शिवसेना सामाजिक न्याय विभागास बळ देण्याचे-खा.ज्योती वाघमारेंचे शिर्डीत आवाहन

Cityline Media
0
शिर्डी प्नतिनिधी शिर्डी लोकसभा मतदारसंघात शिवसेनेची ताकद वाढविण्यासाठी शिवसेनेच्या सामाजिक न्याय विभागाने प्रयत्न करणे गरजेचे असून सामाजिक न्याय विभागाला सर्वोतोपरी सहकार्य करू असे आश्वासन राज्य सभेच्या खासदार ज्योती वाघमारे यांनी नुकतेच शिर्डी येथे केले.यावेळी जिल्हा प्रमुख किशोर वाघमारे यांनी ताकद देण्याची मागणी करत साकडे घातले  .
यावेळी खासदार वाघमारे म्हणाल्या की,येणाऱ्या काळात शिर्डी लोकसभा मतदारसंघाचा भावी खासदार शिवसेना शिंदे गटातच होणार असून कार्यकर्त्यांनी कामाला लागावे अशा सूचना दिल्या.

 यावेळी मा.खासदार सदाशिव लोखंडे,जिल्हाप्रमुख कमलाकर कोते ,नितीन औताडे, जिल्हा महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख सुनिता शेळके, शिवसेना शेतकरी संघटनेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष रवींद्र मोरे, शिवसेना सामाजिक न्याय विभागाचे उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष 

सुनील वाघमारे, जिल्हाप्रमुख किशोर वाघमारे, सरचिटणीस अंतोन भोसले, तालुकाप्रमुख बाबासाहेब दिवे, शहर प्रमुख उत्तम त्रिभुवन, जिल्हा संघटक विजय काळे, महिला आघाडी जिल्हा उपप्रमुख मनीषा दुबळ, तालुकाप्रमुख अनिता निवे, युवा सेना जिल्हाप्रमुख महेश देशमुख,

उपजिल्हाप्रमुख शाम गोसावी,तालुकाप्रमुख सागर बोठे,शहर प्रमुख पूजा  सोमवंशी, शहराध्यक्ष राहता अक्षय सदाफळ आदी मान्यवर   शिर्डी येथे शासकीय विश्रामगृह येथे मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यावेळी खासदार ज्योती वाघमारे यांनी शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना बोलत होते.

यावेळी त्यांनी शिर्डी लोकसभा मतदारसंघात पक्षाच्या वतीने बीएलओच्या अधिपत्याखाली पक्षाच्या वतीने प्रत्येक बुथमध्ये पक्षाचा बी एल ए पदाधिकाऱ्याची नेमणूक करून बोगस मतदान चुकीची नावे वगळलेली नावे आदींचा अभ्यास करून अचूक नावे मतदार यादीत दुरुस्ती करून समाविष्ट करावे असे आवाहन यावेळी त्यांनी शिवसैनिकांना मार्गदर्शन केले.

शिवसैनिकांनी आपली मरगळ झटकत पक्ष वाढीसाठी व येणाऱ्या काळातील जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी गाव गटामध्ये गणामध्ये कामाची सुरुवात करून येणाऱ्या पंचवार्षिकला शिवसेना शिंदे गटाचा धनुष्यबाणाचा खासदार करण्यासाठी कामाला लागावे असे आवाहन करण्यात आले.

यावेळी मा.खासदार सदाशिव लोखंडे यांनी आपलं मनोगत व्यक्त करत शिवसेना पक्ष वाढीसाठी लोकसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांनी काम करावे असे आवाहन केले तर यावेळी कमलाकर कोते यांनी आपल्या प्रस्तावित भाषणामध्ये शिर्डी विधानसभा मतदारसंघाचा संगमनेर अकोले मतदारसंघात पक्षाचे काम जास्त प्रमाणात सुरू असून लवकरात लवकर बीएलए च्या याद्या पक्षाकडे सुपूर्द करण्यात येणार असून येणाऱ्या काळामध्ये घराघरांमध्ये एकनाथ शिंदे यांचे विचार पोचविणार असून गाव तिथे शिवसेना शाखा उभी करणार असून येणाऱ्या काळामध्ये शिर्डी लोकसभा मतदारसंघात शिवसैनिकांनी शिवसेना पक्ष एक नंबरचा करावा असे आवाहन करत खासदार ज्योती वाघमारे यांचे त्यांनी स्वागत केले यावेळी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन जिल्हा संघटक विजय काळे यांनी केले
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!