कारभारी अंबु जोंधळे यांची संगमनेर गटविकास अधिकाऱ्यांकडे तक्रार
कोकणगाव मच्छिंद्र पवार प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण (घरकुल योजना) मध्ये पात्र लाभार्थ्यांकडून घर मंजूर करण्यासाठी किंवा हप्ते मिळवण्यासाठी ग्रामसेवक,सरपंच, उपसरपंच व दलाल संगनमताने लाच उकळत असल्याचा प्रकार नेहमी समोर येत असतो त्यात संगमनेर तालुक्यातील कोकणगाव ग्रामपंचायत पदाधिकारी कसे? अपवाद ठरतील निधी मंजूर करणे,आणि घर बांधकाम अपूर्ण असतानाही चुकीचे दाखले देऊन निधी लाटणे,असे गैरव्यवहार या योजनेत होत आहेत.
तालुक्यातील राजकीय सामाजिक दृष्ट्या महत्वाची समजली जाणाऱ्या कोकणगांव शिवापुर ग्रामपंचायत उपसरपंच याचा गजब कारभार नुकताच चव्हाट्यावर येत जनतेसमोर आला आहे येथील उपसरपंच दिलीप आण्णासाहेब जोंधळे यांनी घरकुल मंजुर करून देतो म्हणून येथील वयोवृद्ध ग्रामस्थ कारभारी आंबु जोंधळे (वय ८०) याच्यांकडून दोन हजार रूपये घेतले आहे.
मुलांच्या नावे अजुन एक घरकुल देतो म्हणून वाढीव पैसे मागितले आहे परंतु लाभार्थी हे गरीब असल्याने ते आधिक पैसे देऊ शकले नाहीत पैसे देऊन एक वर्ष कालावधी झाला तरी पण घरकुल मंजुर न झाल्यामुळे उपसरपंच दिलीप जोंधळे याना विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.
हवालदिल झालेले वृध्द कारभारी जोंधळे यानी पंचायत समिती येथे धाव घेऊन संबंधित उपसरपंच याची तक्रार गटविकास आधिकारी यांच्याकडे केली आहे संबंधित उपसरपंच हे कोकणगांव येथील निझर्णेशवर देवस्थानचे विश्वस्त असल्यामुळे त्याचा मोठा राजकीय दबदबा आहे.
पिडीत वृध्द यांना न्याय भेटेल की नाही याबाबत कोकणगांव शिवापुर येथील नागरिकांच्या मनात मोठी शंका निर्माण झाली आहे त्यामुळे काय कारवाई होणार याकडे सर्व गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे या उपसरपंचानी आपला पदाचा गैरवापर करत अनेक घरकुल लाभार्थ्यांना गंडा घातला असल्याची चर्चा येथील ग्रामस्थ दबक्या आवाजात बोलत आहे.
या प्रकरणाची चौकशी झाली तर यात अनेक अधिकार्यांची नावे समोर येण्याची दाट शक्यता आहे.
