संगमनेर नितीनचंद्र भालेराव गेल्या अडीच हजार वर्षांपूर्वी जगाला हिंसेपासून दूर करण्याचे काम ज्या बोधिसत्वाने केले, ते बोधिसत्व गौतम बुद्ध यांची जयंती जगाच्या कानाकोपऱ्यात आनंदाने साजरी केली जाते.तालुक्यातील हिवरगाव पावसा येथे वैशाख पौर्णिमेनिमित्त भीमशक्ती तरुण मित्र मंडळ आणि महात्मा फुले,डॉ.आंबेडकर,राजर्षी शाहू विचार मंच यांच्या संयुक्त विद्यमाने येथील बुद्ध विहारात बुद्ध जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.प्रसंगी बुद्ध विहारात भगवान बुद्ध,डॉ.बाबासाहेब आंबेडकर,छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले.
तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या उपदेशाप्रमाणे आपल्या आयुष्यात अहिंसा आणि शांतीचं अनुकरण करावं. “माणूसपण हरवत चाललं आहे, ते सर्वांनी एकत्र येत पुन्हा जागृत करण्याची गरज आहे,” असे शिवसेना मागासवर्गीय आघाडीचे जिल्हा पदाधिकारी सोमनाथ भालेराव यांनी यावेळी सांगितले
यावेळी त्रिशरण आणि पंचशील,बुद्ध वंदना नितीनचंद्र भालेराव यांच्या उपस्थितीत झाले. तसेच "जगाला युद्धाची नव्हे तर बुद्धाची गरज आहे,अहिंसा,
शांती,मानवतेचा,बंधुत्वाचा संदेश भगवान बुद्ध यांनी दिला तो आचरणात आणण्याचा प्रयत्न समाज बांधवानी करण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
बाळासाहेब भालेराव यांनी बौद्ध बांधवांनी जनगणनेची माहिती देताना काळजी पुर्वक द्यावी. जनगणना प्रगणकाला धर्म बौद्ध आणि जात पूर्वाश्रमीची महार,तर मराठी भाषे बरोबर पाली भाषेची नोंद करण्यास सांगितले पाहिजे असे आवाहन केले.
याप्रसंगी बालसंस्कार केंद्रातील विद्यार्थी व बौद्ध बांधवांच्या उपस्थिती मुळे परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण झालं होते.कार्यक्रमातून समाजात शांतता, बंधुता आणि समतेचा संदेश देण्यात आला.कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांना अल्पोहार देण्यात आला.
कार्यक्रमाला मन्सूर इनामदार, बाळासाहेब भालेराव,प्रल्हाद मोकळ,महेंद्र भालेराव,गीताराम भालेराव,शरद मोकळ,विकास दारोळे,करण दारोळे,गौरव दारोळे,गणेश दारोळे,समाधान भालेराव,मानव भालेराव यांच्या सह बालसंस्कार केंद्रातील विद्यार्थी उपस्थित होते.
