चणेगावात वाळू तस्करांनी दलित आदिवासींच्या स्मशानभूमीतील सांगाडे उकरुन ‌केला रस्ता

Cityline Media
0
ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी

 चणेगाव प्रतिनिधी संगमनेर तालुक्यातील चणेगाव येथील गट न.१ मधील दलित आदिवासी दफनभूमीत वाळू तस्करांनी जेसीबी पोकलेनच्या सहाय्याने बेकायदेशीर उत्खनन करुन अवशेष उकरत स्मशानभूमीतून रस्ता बनविल्याने खळबळ उडाली आहे.येथील दलित आदिवासी लोकांनी आक्रमक भूमिका घेऊन संबंधित वाळू तस्करांवर कडक कारवाई करण्याची मागणी शासन दरबारी केली आहे.
सविस्तर वृत्त असे की येथील प्रवरा नदीच्या काठावर हि दलित आदिवासी इतर अनुसूचित जाती/जमाती यांची एकत्रित ५ गुंठे स्मशानभूमी आहे यापुर्वी देखील अनेकदा या स्मशानभूमी बाबत वादंग झाले आहे.ग्रामपंचायतीची याबाबत स्पष्ट भूमिका नसल्याने आता मात्र वाळू तस्करांनी कुणाच्या तरी सांगण्यावरून हि स्मशानभूमी नष्ट करण्याचे षडयंत्र रचले आहे हि बाब येथील जागृत ग्रामस्थांच्या लक्षात आल्याने येथे मोठा गदारोळ झाला आणि या विषयावर ग्रामसभा आयोजित केली यांची कुणकुण लागताच वाळू तस्करांनी येथील जेसीबी पोकलेन येथुन हलविले आणि पोबारा केला.

येथील नागरिकांनी संगमनेर येथील तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की चणेगाव येथील गट नंबर १ मधील दफनभूमीत आमच्या पुर्वजांचे व नातेवाईकांचे मृतदेह दफन केलेले आहे हि जागा आमच्यासाठी अंत्यत पवित्र व श्रद्धास्थान आहे.

परंतु काही अज्ञात व्यक्तींनी कुणाच्यातरी सांगण्यावरून या स्मशानभूमीत बेकायदेशीररित्या नदीतून वाळू उपसा करण्यासाठी दफनभूमीचे बेकायदेशीररित्या उत्खनन करून येथून वाळू वाहण्यासाठी रस्ता केला आहे यामुळे दफन केलेल्या मृत व्यक्तीच्या जागेचा अपमान असून आमच्या धार्मिक भावना दुखविल्या आहे.

हा प्रकार कायद्याच्या विरोधात असून सदरचा प्रकार भारतीय दंड संहिता कलम २९५ धार्मिक स्थळांचा अपमान २९७ (दफनभूमीचा अपमान) व भारतीय संहिता कलम २९८,३०० व अनुसूचित जाती व जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम १९८९ अंतर्गत कलम ३(१)(एफ) व ३(१) (जी) नुसार हा गुन्हा असून या वाळू तस्करावर आणि त्यांच्या पाठीराख्यावर त्वरित गुन्हा दाखल करण्यात यावा.

तसेच या स्मशानभूमीचा गट न.१ मधील बेकायदेशीर उत्खनन केलेले व्यक्तीवर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.
संबंधित अज्ञात वाळू तस्कर आणि त्यांचे पाठीराखे यांच्यावर   भारतीय दंड सहिता २९५,२९७ व भारतीय न्याय संहिता २९८,३०० तसेच एस्सी/एसटी ३(१) एफ व ३ (१)(जी) नुसार कारवाई करण्यात यावी.

या निवेदनाद्वारे प्रशासनाला इशारा देण्यात आला आहे की आमच्या भावनांचा विचार करून गाव पातळीवरील सामाजिक सलोखा व कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी त्वरित या वाळू तस्करावर व त्यांच्या पाठीराख्यांवर कडक कारवाई करावी अन्यथा येथील आदिवासी दलित व ग्रामस्थ आमरण उपोषण करेल

 या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी,उपविभागीय पोलीस अधिकारी,प्रांताधिकारी संगमनेर तहसीलदार पोलीस निरीक्षक आश्वी ग्रामीण पोलिस ठाणे,मंडळाधिकारी शिबलापूर तलाठी कार्यालय चणेगाव ग्रामपंचायत कार्यालय चणेगाव, सरपंच चणेगाव यांना कार्यवाहीस्तव देण्यात आल्या आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!