श्री स्वामी समर्थ प्रचिती ही शॉर्ट फिल्म शिर्डी आंतरराष्ट्रीय लघुपट फिल्म महोत्सवात दाखल

Cityline Media
0
शिर्डी प्नतिनिधी अहिल्यानगर जिल्ह्यातील राहता तालुक्यातील निर्मळ पिंपरी या छोट्याशा गावाने पुन्हा एकदा मोठी झेप घेतली आहे. श्री. स्वामी समर्थ प्रचिती हा लघुपट अधिकृतपणे शिर्डी इंटरनॅशनल शॉर्ट फिल्म फेस्टिव्हल २०२६ मध्ये निवडला गेल्याने गावासह संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
शिर्डी आंतरराष्ट्रीय लघुपट फिल्म महोत्सव आयोजक निर्माता अभिनेता मधुकर कर्डक.व आर जी सेवन स्टुडिओ आयोजक रंगराव घागरे यांनी आयोजित केलेल्या या फेस्टिवल मध्ये या लघुपटाची नोंद झाली आहे.
विशेष म्हणजे,हा लघुपट केवळ मनोरंजनासाठी नाही,तर सत्यघटनेवर आधारित एक थरारक आणि भावनिक आध्यात्मिक अनुभव* आहे. “मनापासून स्वामी भक्ती केली तर प्रचिती ही येतेच” — हा या चित्रपटाचा गाभा आहे.ही कुठली जादू किंवा चमत्कार नाही,तर श्रद्धा, विश्वास आणि अंतःकरणातून केलेली भक्ती यांची शक्ती आहे, असा ठाम संदेश या लघुपटातून देण्यात आला आहे.

“भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे” श्री स्वामी समर्थ यांच्या या शब्दांचा जिवंत अनुभव या चित्रपटातून प्रेक्षकांना येतो.अडचणीच्या काळात कोणीतरी अदृश्य शक्ती आपल्याला आधार देत असते, ही भावना इतक्या प्रभावीपणे मांडली आहे की प्रेक्षक अक्षरशः भावूक होतात.

निर्माते आबा निर्मळ आणि दिग्दर्शक प्रमोद निर्मळ यांनी कोणताही पूर्वानुभव नसताना, नोकरी आणि व्यवसाय सांभाळत,केवळ जिद्द आणि श्रद्धेच्या बळावर हा प्रकल्प उभा केला आहे. त्यांच्या या मेहनतीला कलाकारांची साथ लाभली — मनीषा गुळवे, ज्ञानेश्वर थोटे, प्रमोद निर्मळ, ज्ञानेश्वर साबळे, नरसिंम्हा सिंग, सुरज बी निर्मळ, डॉ. गोकुळ शेंळके, वनिता निर्मळ आणि राणी निर्मळ यांनी आपल्या अभिनयातून कथेला जिवंत केले आहे.

या लघुपटाने एक वेगळीच चर्चा रंगवली आहे ही केवळ फिल्म नाही, तर “अनुभव” आहे… श्रद्धेचा, भक्तीचा आणि आत्मविश्वासाचा! गावाकडच्या साध्या वातावरणातून तयार झालेली ही कलाकृती आता थेट आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचली असून, “लोकल ते ग्लोबल” हा प्रवास अक्षरशः साकार झाला आहे.

पत्रकारांशी बोलताना आबा निर्मळ आणि प्रमोद निर्मळ म्हणाले, “प्रेक्षकांचे असेच प्रेम आणि पाठबळ मिळत राहिले, तर यापुढेही भन्नाट विषयांवर आणखी ताकदीच्या फिल्म्स आम्ही घेऊन येऊ. नवीन प्रोजेक्टचे शूटिंग लवकरच सुरू होत आहे.”

निर्मळ पिंपरीच्या या यशामुळे संपूर्ण अहिल्यानगर जिल्हा अभिमानाने भारावून गेला आहे.श्रद्धा असेल तर प्रचिती नक्की येते आणि हीच आहे खरी ‘स्वामी प्रचिती असा विश्वास यावेळी निर्मात्यांनी व्यक्त केला.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!