बाभळेश्वर मध्ये रविवारी ख्रिस्ती वधू वर मेळाव्याचे आयोजन

Cityline Media
0
राहाता प्नतिनिधी तालुक्यातील बाभळेश्वर येथील बाळ येशू चर्च,व संगमनेर येथील दादाभाऊ भोसले प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार १० मे रोजी दुपारी बारा वाजता १७३ व्या ख्रिस्ती वधू-वर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
हा मेळावा बाळ येशू चर्च, श्रीराम डेअरीजवळ,लोणी रोड,  बाभळेश्वर या ठिकाणी पार पडणार आहे.या सामाजिक उपक्रमात उपस्थित पालकांना व विवाहेच्छूकांना मार्गदर्शन करण्यासाठी फादर मायकल वाघमारे,फादर संजय पंडित, संजय शेळकेसर, सियोना प्रभूणे,शोभा ब्राम्हणे,मीना क्षेत्रे व दीपाली नागपुरे उपस्थित राहणार आहेत.

सर्व पालक व इच्छुकांना एकत्र आणून परस्पर संवाद साधणे व योग्य निर्णय घेण्याच्या उद्देशाने आयोजित केलेल्या या मेळाव्यात अविवाहीत, विधवा, विधुर, धटस्फोटीत व अपंग यांनी वेळेवर उपस्थित राहून आलेल्या या सुवर्णं संधीचा फायदा घ्यावा असे अवाहन संयोजक श्रीधर भोसले यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी ७०८३९२२०५२ या दुरध्वनीवर संपर्क साधावा असे आवाहन देखील करण्यात आले आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!