नाशिक दिनकर गायकवाड सिन्नर तालुक्यातील श्री. सिद्धकपिलेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथील विद्यार्थ्यांनी शैक्षणिक गुणवत्तेची परंपरा कायम राखत उत्कृष्ट निकालाची नोंद केली आहे. विद्यालयातील गुणवंत विद्यार्थिनींनी उज्वल यश संपादन करून शाळेचे व पालकांचे नाव अभिमानाने उंचावले आहे.
गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये प्रथम क्रमांक –कु. धनश्री नवनाथ उगले हिने मिळविला असून तिला (८५.८० शेकडा गुण मिळाले आहे.तर द्वितीय क्रमांक – कु. आकांक्षा मधुकर सुर्वे हिने प्राप्त केला असून तिला ८४.०० शेकडा गुण मिळाले तृतीय क्रमांक कु. ईश्वरी प्रकाश खाडे हिस मिळाला तिला ७९.६० शेकडा गुण मिळाले आहे.
या विद्यार्थिनींचा संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव,सहसचिव, खजिनदार,संचालक मंडळ,मुख्याध्यापक,शिक्षक-शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या या यशामुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
